Box Office Collection: 'मिशन राणीगंज','जवान' की फुकरे.. 'नॅशनल सिनेमा डे'चा फायदा कोणत्या चित्रपटाला?

नॅशनल सिनेमा डे निमित्त 'मिशन राणीगंज' आणि 'थँक्यू फॉर कमिंग' या चित्रपटाने बॉक्स ऑफिस किती कोटींची कमाई केली...
Mission Raniganj Vs Thank You For Coming Vs Jawan vs  Fukrey 3 Box Office Collection On National Cinema Day 2023
Mission Raniganj Vs Thank You For Coming Vs Jawan vs Fukrey 3 Box Office Collection On National Cinema Day 2023Esakal
Updated on

National Cinema Day 2023: 13 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय सिनेमा डे सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक भन्नाट ऑफर सिनेमाप्रेमींना देण्यात आली होती. यात शुक्रवारी प्रेक्षकांना मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा डे च्या निमित्तानं केवळ 99 रुपयांत चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला.

तर बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा 'जवान', आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'थँक यू फॉर कमिंग' आणि अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' आणि फुकरे हे हिंदी सिनेमे प्रेक्षकांना पाहता येणार होते.

तर आता प्रेक्षकांनी कोणत्या सिनेमाला पसंती दिली आणि कोणत्या चित्रपटाने किती कोटींचे कलेक्शन केले याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे.

Jawan Box Office Collection:

शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट गेल्या एक महिन्यापासून चित्रपटगृहात टिकून राहिला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत अनेक विक्रम केले असले तरी या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे.

रिलीजच्या 37 व्या दिवशी पुन्हा एकदा 'जवान' चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. नॅशनल सिनेमा डेचा फायदा या चित्रपटाला मिळाला आहे.

जवान या चित्रपटाने सहाव्या शुक्रवारी पाच कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर तर 37 दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई आता 632.24 कोटींवर पोहोचली आहे.

Mission Raniganj Vs Thank You For Coming Vs Jawan vs  Fukrey 3 Box Office Collection On National Cinema Day 2023
India Vs Pakistan Match: भारत-पाकिस्तान सामन्यात कलाकारांची मांदियाळी! अनुष्का, अरिजित पोहचले स्टेडियमवर

Mission Raniganj Box Office Collection:

अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' हा सिनेमा रिअल लाइफ हिरो जसवंत सिंग गिल यांच्या कथेवर आधारित आहे. 1989 मध्ये, त्यांनी पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील कोळसा खाणीत अडकलेल्या 65 खाण कामगारांची त्यांनी सुटका केली.

गेले काही दिवस या चित्रपटाने काही खास कमाल केली नाही मात्र रिलिजच्या 8 व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली.

SACNILC च्या रिपोर्टनुसार, 'मिशन राणीगंज' ने रिलीजच्या 8 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी 5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या आकडेवारीसोबत 'मिशन राणीगंज'ची एकूण कमाई 23.25 कोटी रुपये झाली आहे.

Mission Raniganj Vs Thank You For Coming Vs Jawan vs  Fukrey 3 Box Office Collection On National Cinema Day 2023
Prakash Raj: "जेव्हा राजा सत्तेसाठी भुकेला असतो",जागतिक उपासमार निर्देशांकाचा हवाला देत प्रकाश राज यांची मोदींवर जहरी टीका!

Fukrey 3 Box Office Collection:

फुक्रे फ्रँचायझीच्या 'फुकरे 3' हा चित्रपट देखील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यात वरुण शर्मा, पुलकित सम्राट, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी आणि रिचा चढ्ढा या कलाकारांनी आपल्या कॉमेडीने सर्वांना वेड लावले आहे.

फुकरे 3 ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 'फुकरे 3' ने रिलीजच्या 16व्या दिवशी एकूण 5.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण 16 दिवसांचे कलेक्शन आता 86.54 कोटी रुपये झाले आहे.

Thank You For Coming Box Office Collection:

भूमी पेडणेकर, शहनाज गिल आणि कुशा कपिला स्टारर 'थँक यू फॉर कमिंग' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला आहे. करण बुलानी दिग्दर्शित केलेल्या 'थँक यू फॉर कमिंग' ने पहिल्या आठवड्यात केवळ 4.95 कोटींची कमाई केली तर आठव्या दिवशी फक्त 75 लाख रुपयांची कमाई केली आहे.

Mission Raniganj Vs Thank You For Coming Vs Jawan vs  Fukrey 3 Box Office Collection On National Cinema Day 2023
Vicky Kaushal: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ला नडणार 'सॅम बहादूर'! विकीनं अखेर मौन सोडलं,..

आता या चित्रपटाच्या कलेक्शनकडे पाहिले असता नॅशनल सिनेमा डेचा फायदा शाहरुख खानच्या जवान चित्रपटाला आणि अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' या सिनेमाला मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.