Mithun Chakraborty: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना दोन दिवसांपूर्वी कोलकाता (Kolkata) येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिथुन यांना अचानक छातीत दुखू लागले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.मिथुन यांना ब्रेनस्ट्रोक झाला होता, असं म्हटलं जात होतं. सध्या मिथुन यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता मिथुन यांचा रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भाजप (BJP) नेते दिलीप घोष (Dilip Ghosh) हे मिथुन यांना गुलाबाचे फूल देताना दिसत आहेत.
मिथुन यांचा रुग्णालयातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मिथुन चक्रवर्ती हॉस्पिटलच्या बेडवर बसलेले दिसत आहेत. तर दिलीप घोष त्यांना गुलाबाचे फूल देताना दिसत आहेत. भाजप नेते सुकांता मजुमदार यांनी देखील मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे.
छातीत तीव्र वेदना होत असल्यानेमिथुन यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्या मेंदूच्या एमआरआय, रेडिओलॉजी आणि प्रयोगशाळेच्या चाचण्या करण्यात आल्या. रिपोर्टनुसार, मिथुन चक्रवर्ती यांना इस्केमिक सेरेब्रोव्हस्कुलर अपघात (स्ट्रोक) झाला आहे, जो मेंदूच्या नुकसानाशी संबंधित आहे. सध्या डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनी 2023 मध्ये रिलीज झालेल्या Kabuliwala या चित्रपटामध्ये काम केलं. तसेच त्यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटामध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली. मिथुन चक्रवर्ती यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.