Jawan Shah Rukh Khan: शाहरुखचा जवान कसा वाटला? सत्यजित तांबे म्हणतात...

आमदार सत्यजित तांबेंनी जवान सिनेमा पाहून सिनेमाबद्दल प्रतिक्रिया दिलीय
mla satyajeet tambe watch shah rukh khan jawan and comment on that
mla satyajeet tambe watch shah rukh khan jawan and comment on thatSAKAL
Updated on

Jawan News: जवान सिनेमा सध्या बॉक्स ऑफीसवर चांगलं यश मिळवतोय. जवान सिनेमाने नुकतंच बॉक्स ऑफीसवर १००० कोटीपेक्षा जास्त कमाई केलीय. जवान सिनेमा आजवर अनेकांनी पाहिला असेलच.

जवान सिनेमा आजवर सामान्य माणसांपासुन बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत आणि अनेक राजकारणी माणसांनी बघितला. अशातच आमदार सत्यजित तांबेंनी जवान सिनेमा पाहिलाय. सत्यजित तांबेंना जवान आवडला की नाही? बघूया.

(mla satyajeet tambe watch shah rukh khan jawan)

mla satyajeet tambe watch shah rukh khan jawan and comment on that
Mission Raniganj Trailer: भारत माता की जय! अक्षय कुमारच्या 'मिशन राणीगंज'चा अंगावर काटा आणणारा थरारक ट्रेलर

आमदार सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करत हा चित्रपट राजकीय साक्षरतेला चालना देत असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. तसंच या चाकोरीबाहेरच्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल त्यांनी जवानचं कौतुकही केलं आहे.

जवान चित्रपटात राजकीय साक्षरता आणि सुशासन यांचं महत्त्व सांगणारे अनेक संवाद आहेत. त्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी, तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींवर राजकीय यंत्रणेचं नियंत्रण असतं, असं म्हणत हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सत्यजित तांबे म्हणतात, "राजकीय साक्षरता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असलेलं त्याच्या भवतालाचं ज्ञान! आपण पित असलेल्या पाण्यापासून ते अंत्यसंस्कारांपर्यंत आणि खात असलेल्या अन्नापासून ते सांडपाण्यापर्यंत या सर्वच गोष्टी राजकीय यंत्रणाच आपल्यापर्यंत आणत असतात. या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनावर किती सकारात्मक किवां नकारात्मक प्रभाव पडतो, याचे मूल्यमापन करणे हीच राजकीय साक्षरता असते."

सत्यजित तांबे पुढे म्हणतात, "शाहरूखचा ‘जवान’ नेमकी हीच गोष्ट ठळक करतो. शाहरुख म्हणतो की, देशाने तुमच्यासाठी काय केलं, यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करता, हे महत्त्वाचं आहे. लोकप्रतिनिधीही आपल्याला काय मिळालं, यापेक्षा आपण समाजाला काय दिलं, असा विचार करणारा पाहिजे, असं या चित्रपटात म्हटलं आहे. लोकप्रतिनिधी हे लोकसेवक असतात. त्यांनी नागरिकांची सेवा करायला हवी, हा विचार जवान देतो. या चित्रपटातून मतदार आणि नागरिक अनेक मार्ग शिकू शकतात."

mla satyajeet tambe watch shah rukh khan jawan and comment on that
Siddharth Jadhav: टीव्हीवर गाजलेला शो पुन्हा येतोय, सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा

सत्यजित तांबे शेवटी म्हणतात, "राजकीयदृष्ट्या साक्षर होण्यासाठी एक चांगला नागरिक असणं आवश्यक आहे. कोणती यंत्रणा कशी कार्य करते, हे समजलं, तर राजकीय चौकट समजणं सोपं जाईल. राजकीय यंत्रणा योग्य पद्धतीने कार्य करते की नाही, याची नागरिकांनी खात्री करणं, हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे, असं आमदार तांबे यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. एखादा लोकप्रतिनिधी चुकला, तर तो कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार न करता, त्याला जाब विचारता आला पाहिजे, ही खरी लोकशाही आहे. जवान चित्रपटही हेच सांगतो."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.