Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे (maharashtra navnirman chitrapat sena) अध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) हे वारंवार कलाकारांच्या पाठीशी उभे असतात. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह , प्राईम टाइम मिळण्यापासून ते त्यांच्या वैयक्तिक अडचणीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यांना पाठिंबा असतो. आज मात्र अमेय खोपकर यांनी थेट बॉलीवुडकडे मोर्चा वळवला आहे. पाकिस्तानी कलाकारांबाबत एक ट्विट करत त्यांनी बॉलीवुडला चांगला दम दिला आहे.
(MNS leader ameya khopkar shared tweet to warn bollywood against hiring pakistani actors artist )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांबाबत एक ट्वीट केलं आहे. बॉलिवूड सोबतच इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकार काम करताना दिसले तर चित्रपट निर्मात्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.
'बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.' असे ट्विट खोपकर यांनी केले आहे. या ट्विटनंतर अनेकांचे लक्ष वेधले आहे. हा इशारा नेमका कुणाला आहे याचीही चर्चा सुरू आहे.
मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. आता पुन्हा मनसेने पाकिस्तानी कलाकारांवर भाष्य केल्याने बॉलीवुडमध्ये नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने 2019 मध्ये चित्रपट उद्योगात काम करणार्या पाकिस्तानी कलाकारांवर संपूर्ण बंदी जाहीर केली होती. परंतु तरीही काही निर्माते त्यांना संधी देत असल्याचे दिसत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.