mohan agashe felicited by punyabhushan from anupam kher sharmila tagore in pune
mohan agashe felicited by punyabhushan from anupam kher sharmila tagore in pune SAKAL

Punyabhushan Mohan Agashe: ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशेंचा पुण्यभुषणने सन्मान, मान्यवरांच्या हस्ते गौरव

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशें यांना ३४ व्या पुण्यभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Published on

Mohan Agashe Punyabhushan Award News: ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना पुण्यभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेते मोहन आगाशे यांना अनुपम खेर, शर्मिला टागोर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

गेली अनेक वर्ष स्वतःच्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते यांना ३४ व्या पुण्यभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

(mohan agashe felicited by punyabhushan from anupam kher sharmila tagore in pune)

mohan agashe felicited by punyabhushan from anupam kher sharmila tagore in pune
Rocky Aur Rani ki Prem Kahani: रॉकी और रानी की प्रेम कहानी चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, पण सिनेमात मोठा बदल

पुरस्काराचे स्वरुप

मोहन आगाशेंना पुण्यभुषण सन्मानाचे स्मृतिचिन्ह आणि रूपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारचे वैशिष्ट्य आहे.

याबरोबरच कर्तव्य बजावित असताना जखमी झालेल्या ५ जवानांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. मोहन आगाशेंना मिळालेला पुण्यभुषण हा त्यांचा कारकीर्दीचा आदरपुर्वक सन्मान म्हणता येईल.

उपस्थित मान्यवर

त्रिदल पुणे, पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना खेर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी मानकरी प्रतापराव पवार, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते.

याच कार्यक्रमात मृदुल घोष, सुदाम दिशोई, उमेंद्रा एम., निर्मलकुमार क्षेत्री या जवानांचा विशेष सन्मान करण्यात आला.

mohan agashe felicited by punyabhushan from anupam kher sharmila tagore in pune
Khalapur Landslide: तुमच्या कार्याला सलाम! इर्शाळवाडीतील मुख्यमंत्र्यांची तत्परता बघुन हार्दिक जोशीने केलं कौतुक

आधी कोणाला मिळालाय पुण्यभूषण?

याआधी महामहिम माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी,

मनोहर जोशी, खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे सर्वच माजी मुख्यमंत्री, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव, सचिन तेंडूलकर, पांडुरंगशास्त्री आठवले,

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, दि हिंदूचे संपादक एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, महेश एलकुंचवार,

डॉ. विकास आमटे, आशा भोसले, नारायण मूर्ती, शरद यादव, नितीन गडकरी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. अमदजअली खान आणि पं. शिवकुमार शर्मा, प्रफुल्ल पटेल आदी मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा यथोचित सन्मान केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.