Moive Review: हळूवार फुलत जाणारी प्रेमकथा - ऊन सावली

दोन्ही कलाकारांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या असून प्रेक्षकांच्या त्या पसंतीस उतरलेल्या आहेत|
Moive Review unsawali
Moive Review unsawali sakal
Updated on

अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे यांनी छोट्या व मोठ्या पडद्यावर उत्तम कामगिरी केली आहे. या दोन्ही कलाकारांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या असून प्रेक्षकांच्या त्या पसंतीस उतरलेल्या आहेत.

Moive Review unsawali
Movie Review: रहस्याने गुंतवून ठेवणारी कथा - मर्डर मुबारक

आता हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत ऊन सावली या मराठी चित्रपटासाठी दिवाकर नाईक दिग्दर्शक आणि समीर शेख यांची निर्मिती असलेला हा चित्रपट आता सगळीकडे प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाची कथा दोन व्यक्तिरेखांभोवती फिरणारी आहे. ही एक अॅरेंज मॅरेज कम लव्हस्टोरी आहे. एका वेगळ्या धाटणीची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. प्रणय (भूषण प्रधान) हा आर्किटेक्ट असतो.

आता त्याच्या लग्नाचे वय झाल्यामुळे त्याचे आई-वडील त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावतात. परंतु तो काही लग्न करण्यास तयार होत नाही. अशातच एके दिवशी त्याचे आई-बाबा त्याला खूप आग्रह करतात.

Moive Review unsawali
Yodha Twitter Review: कुणी म्हणालं, "पैसा वसूल" तर कुणी म्हणालं, "जबरदस्त क्लायमॅक्स"; सिद्धार्थचा 'योद्धा'कसा आहे? वाचा रिव्ह्यू

अन्वी (शिवानी सुर्वे) नावाच्या मुलीचे स्थळ आलेले आहे आणि तुला ते पाहावेच लागेल असे त्याला सांगतात. आई-वडिलांच्या आग्रहास्तव प्रणय ते स्थळ पाहण्यास यार होतो. अन्वी ही उत्तम शिकली सवरलेली तरुणी असते.

स्वतःचा व्यवसाय करावा असे तिचे स्वप्न असते. त्यामुळे लग्न करण्यास तिचा ठाम नकार असतो. परंतु तिची आई तिला लग्न करण्याचा सल्ला देते. मग आईची मर्जी राखण्याकरिता अन्वी लग्न करण्यास तयार होते. पहिल्याच भेटीमध्ये प्रणयला अन्वी आवडायला लागते. त्यानंतर त्यांची

अॅगेजमेंट होते आणि मग अवनी व प्रणय यांचे अॅरेंज मॅरेज लव्हस्टोरी कशा पद्धतीने पुढे सरकते...त्यामध्ये काही अडथळे येतात का...त्याच्यावर कशी मात केली जाते ही कथा म्हणजे हा चित्रपट. दिग्दर्शक दिवाकर नाईक यांनी दोन अनोळखी जीवांची गुंफलेली ही हळूवार प्रेमकहाणी आहे.

Moive Review unsawali
Amaltash Movie Review: सुरेल संगीताची जमलेली मैफल

अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री शिवानी सुर्वे यांच्याबरोबरच अजिंक्य ननावरे, राज सरनागत, अंकिता भोईर, विकास हांडे, श्वेता कामत, प्रिया तुळजापूरकर आणि मनाली निकम या कलाकारांनीदेखील आपापल्या वाट्याला

आलेल्या भूमिका चोख केल्या आहेत. अन्वीची महत्त्वाकांक्षी आणि तितकीच धीरगंभीर अशी भूमिका शिवानीने समरसून साकारली आहे. भूषणनेदेखील प्रणयच्या भूमिकेत आपली छाप चांगली उमटविली आहे. चित्रपटाचे संगीत कथेला पुढे नेणारे असेच झाले आहे.

मात्र कथेच्या गाभा खूप छोटा आहे. त्यामुळे चित्रपट काही ठराविक लोकेशन्सवर अधिक फिरताना दिसतो. चित्रपट सुरुवातीला फारशी पकड घेणारा नसला तरी मध्यांतरानंतर चित्रपटाची कथा छान टर्निंग पाॅइंट घेते. त्यामुळे उत्सुकता अधिक ताणली जाते.

चित्रपटाचे शीर्षक गीत छान जमलेले आहे आणि ते प्रेक्षकांना आवडलेले आहे. दिग्दर्शक दिवाकर नाईक यांनी ही कथा अॅरेंज मॅरेज आणि त्यानंतर फुलणारी प्रेमकथा छान मांडली आहे. ही एक हळूवार अशी प्रेमकथा आहे.

तीन स्टार

Moive Review unsawali
Crakk Review: साधारण कथेला अ‍ॅक्शन सीन्सचा आधार; विद्युत जामवालचा 'क्रॅक' पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.