लग्नात नाचण्याचे पैसे घेतले अन्...; अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात निघालं वॉरंट!

गदर अभिनेत्रीविरोधात मुरादाबादच्या एसीजेएम-५ न्यायालयात वॉरंट जारी झालाय.
Warrant issued against Ameesha Patel
Warrant issued against Ameesha Patelesakal
Updated on

सुपरहिट चित्रपट गदर एक प्रेम कथा अभिनेत्री अमिषा पटेल मागल्या काही दिवसांत गदर चित्रपटाच्या सीक्वलसाठी चर्चेत आहे. मात्र आज या अभिनेत्रीबाबत एक अशी बातमी पुढे येतेय ज्यामुळे निश्चितच चाहते चकित होणार आहेत. गदर अभिनेत्रीविरोधात मुरादाबादच्या 'एसीजेएम-५' न्यायालयात वॉरंट जारी झालाय. नेमके या अभिनेत्रीने केले तरी काय हे कळल्यावर निश्चितच चाहते अमिशावर नाराज होणार आहे. (Warrant issued against Ameesha Patel in moradabad court)

कोर्टाच्या सुनावणीला न पोहोचल्याने मुरादाबादच्या एसीजेएम-५ न्यायालयाने अमिषाविरोधात वॉरंट जारी केलं आहे. ११ लाख रूपये घेऊन एका लग्नात डान्स करण्याचं अमिषानं ठरवलं होतं. पैसे घेऊन अभिनेत्री लग्नात पोहोचली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने अमिषावर ११ लाख रूपये घेऊन कार्यक्रमात न आल्याचा आरोप लावला.

अमिषा पटेल आणि तिच्या टीमवर ११ लाख अॅडवांस घेण्याचा आरोप केला गेलाय. एका लग्नात सहभागी होण्यासाठी अमिषा पटेलला आमंत्रण दिल्या गेलं होतं.लग्नसोहळ्याच्या या कार्यक्रमात नाचण्यासाठी ने ११ लाखाची रक्कम अॅडवांस म्हणून घेतली होती.मात्र ती या सोहळ्यात अनुपस्थित होती. (She promised to dance in marriage function and taken 11 lakh advance for that)

Warrant issued against Ameesha Patel
Ameesha Patel Birthday: वडिलांवरच केला कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप!

याआधीही अभिनेत्री कायद्याच्या कचाट्यात अडकली होती. तिच्याविरोधात मुरादाबाद न्यायालयात कलम १२०-ब, ४०६, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागल्या वर्षीही भोपाल न्यायालयात अमिषाविरोधात वॉरंट निघालं होतं. अमिशा आणि तिच्या भावावर फसवणुकीचा आरोप होता. हे प्रकरण त्यावेळी हायकोर्टापर्यंत गेलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()