Iranian Director mahanaz mohammadi : केरळ फिल्म फेस्टिव्हल २०२२ ची नांदी वाजलेली आहे. या बड्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये देशभरातूनच नाहीत,तर जगभरातील फिल्ममेकर्स आणि एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीशी जोडल्या गेलेल्या बड्या लोकांना सम्मानित केलं जाणार आहे. तसंच,या फिल्म फेस्टिव्हलमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांना दाखवलं जाणार आहे. पण फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी एका वेगळ्या कारणामुळे जोरदार चर्चा रंगली आहे. बातमी आहे की ईराणी दिग्दर्शिका महनाज मोहम्मदीनं केरळ फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपले केस कापून पाठवले आहेत.(Iranian Director mahanaz mohammadi sends cut off hair lock to international film festival)
२७ व्या केरळ फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात शुक्रवारी ९ डिसेंबर रोजी झाली. या समारंभात महनाज मोहम्मदला 'स्पिरिट ऑफ सिनेमा' या पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलं. पण गेल्या काही महिन्यांपासून ईराण मध्ये महिलांच्या अधिकाराविषयी जो लढा सुरु आहे त्यामुळे दिग्दर्शिकेला इराणमधून बाहेर जाण्याची परवानगी मिळाली नाही आणि ती फेस्टिव्हलला त्यामुळे उपस्थित राहू शकली नाही. त्यामुळे तिनं आपली मैत्रिण फिल्ममेकर अॅथेना रॅशेल त्सान्ग्रीकडे आपले कापलेले केस आणि सोबत एक महत्त्वाचा मेसेजही पाठवला आहे.
महनाज मोहम्मदी एक दिग्दर्शिका असण्यासोबतच एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. ईराण मध्ये महिलांना गेल्या काही काळापासून स्वतःच्या अधिकारांसाठी संघर्ष करावा लागत आहे. कितीतरी महिला ईराणमध्ये आपल्या अधिकारासाठी संघर्ष करताना आपले केस कापून हिजाबला जाळत त्याच्याविरोधात प्रदर्शन करताना दिसत आहेत. या आंदोलनाची सुरुवात सप्टेंबर २०२२ मध्ये महसा आमिनीची ईराणी पोलिसांच्या हातून हत्या झाल्यानंतर झाली होती. बोललं जात होतं की महसानं हिजाब परिधान न करत नियमांचे उल्लंघन केले होते. या प्रकरणानंतरच महिलांनी आपल्या अधिकारांसाठी लढा पुकारला.
Athena Rachel Tsangari ने महनाजच्या वतीनं पुरस्कार स्विकारला. आणि त्यानंतर तिनं महनाजच्या कापलेल्या केसांना प्रेक्षकांसमोर दाखविले आणि तिनं महनाजचा मेसेजही वाचून दाखवला. महनाज मोहम्मदीनं लिहिलं होतं- ''हे माझे केस आहेत,जे मी मला होणारा त्रास,संघर्षाचं प्रदर्शन करण्यासाठी कापले आहे. मी हे केस पाठवले आहेत कारण ईराणमध्ये महिलांना समान अधिकार मिळावेत यासाठी अनेकांनी एकत्र येऊन पाठिंबा देण्याची गरज आहे''.
सोबत महनाज मोहम्मदीनं प्रेक्षकांना विनंती केली की, सर्वानी स्त्री, आयुष्य आणि त्यांचे स्वातंत्र्य याच्या घोषणा द्या. दिग्दर्शिकेच्या या विनंतीवजा मेसेजला उपस्थितांनी टाळ्यांनी दाद देत समर्थन केलं. तसंच,महनाजनं सांगितलेल्या घोषणेचा जयघोषही केला.
दिग्दर्शिका महनाज मोहम्मदीला तिच्या 'वीमन विदाऊट शॅडोज','ट्रॅवलोग' आणि 'वी आर हाफ द ईरान्स पॉप्युलेशन' या सिनेमांसाठी ओळखलं जातं. २०१९ मध्ये आलेला तिचा सिनेमा 'सन मदर' चा प्रीमियर ४४ व्या टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडला होता. महिलांच्या अधिकारांसाठी लढलेली महनाज जेलमध्ये देखील गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.