Zwigato Movie Review: कपिल शर्मा शो मधून खळखळून हसवणाऱ्या कपिल शर्मा (Kapil Sharma) चा Zwigato सिनेमा आज भारतात रिलीज आहे. Zwigato सिनेमाची सुरुवातीपासून चर्चा होती. आज Zwigato सिनेमा रिलीज झालाय.
कपिल शर्माने आजवर दोन बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केलाय. कपिलचे हे दोन्ही सिनेमे कॉमेडी होते. पण Zwigato निमित्ताने आजवर कधीही न पाहिलेली कपिलची इमोशनल बाजू दिसतेय. कसा आहे कपिलचा Zwigato जाणून घेऊ
(movie review of kapil sharma new film zwigato directed by nandita das)
काय आहे सिनेमाची कथा?
Zwigato ही कथा आहे मानस सिंग महतो या गिग कामगाराची, जो कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर डिलिव्हरीची छोटी मोठी कामं करत असतो. मानस भुवनेश्वरमध्ये आपल्या कुटुंबासह राहतो.
आधी एका कारखान्यात कामाला असलेल्या मानसला साथीच्या आजारामुळे बेरोजगारीमुळे आठ महिने घरी बसावे लागले. पाच जणांच्या कुटुंबातील एकमेव कमावता असल्याने कपिल zwigato या फूड डिलिव्हरी अँप सोबत भागीदारी करतो.
मग पुढे स्वतःचं डिलिव्हरी रेटिंग वाढवण्यासाठी मानसला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मानसची परिस्थिती बदलते कि त्याच्या आयुष्यात आणखी समस्या निर्माण होतात याची कथा Zwigato मधून पाहायला मिळेल.
कपिल शर्माचा अभिनय कसा आहे?
मानस म्हणून कपिल शर्माने उत्कट आणि भावपूर्ण अभिनय केलाय. कपिलची त्याची देहबोली, त्याची संवादफेक आणि नेहमीच्या पंजाबी टोनशिवाय असलेले त्याचे डायलॉग काळजाला स्पर्श करतात.
कपिलने मानसच्या भूमिके त्याचा आत्मा ओतलाय आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्याची भूमिका साकारली आहे.
कपिल Zwigato मध्ये हसवतो आणि नकळत रडवतो. अभिनेत्री शहाना गोस्वामी पुन्हा एकदा घर सांभाळताना नवऱ्याला मदत करण्याची नायिकेची भूमिका सुंदर साकारली आहे.
लॉकडाऊन मध्ये सामान्य कुटुंबाची जी दयनीय परिस्थिती झाली त्याचे चित्रण नंदिता दास दिग्दर्शित Zwigato मधून पाहायला मिळते.
त्यामुळे कपिल शर्माचे फॅन असाल किंवा नसाल Zwigato तुम्हाला नक्की आवडेल याची १०० % खात्री.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.