Mrunal Kulkarni: तळलेले किडे कसे लागतात चवीला? मृणाल यांनी सांगितला भन्नाट किस्सा..

मृणाल कुलकर्णी यांनी खाल्ले होते तळलेले किडे..
mrinal kulkarni shared her experience of eating fried insects in latest interview
mrinal kulkarni shared her experience of eating fried insects in latest interviewsakal
Updated on

mrinal kulkarni eating fried insects : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. बाल विश्वाला भुरळ घालणारी सोनपरी ते मासाहेब जीजाऊ असा मोठा प्रवास अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केला आहे.

आजवर अनेक मालिका, चित्रपट, नाटक यामध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका केल्या आहेत. tyaत्यांच्या विषयी मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड आदराचं स्थान आहे. त्यांचा मुलगा विराजस आणि सून शिवानी दोघेही मनोरंजन विश्वात आपले पाय रोवत आहेत.

विशेष म्हणजे लवकरच मृणाल कुलकर्णी 'सरी' या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. मृणाल नुकत्याच एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला.

(mrinal kulkarni shared her experience of eating fried insects in latest interview)

mrinal kulkarni shared her experience of eating fried insects in latest interview
Shivaji Satam: बँकेत नोकरी करायचे, CID फेम 'एसीपी प्रद्युमन'.. असा झाला अभिनयाचा प्रवास..

'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चीनला फिरायला गेल्यावर तळलेले किडे खाल्लेले तेव्हा नेमकं काय झालं हा भन्नाट किस्सा सांगितला. असा कोणता पदार्थ आहे जो अजिबात आवडला नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

त्यावर त्या म्हणाल्या, ''काही वर्षांपूर्वी मी, विराजस आणि विराजसचे बाबा असे आम्ही चीनला फिरायला गेलो होतो. तिथे खूप इंटरेस्टिंग पदार्थांची नावं दिसत होती, पण ते नक्की काय असेल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा आम्हाला काही तळलेले किडे मिळाले. त्याची चव फार छान होती पण त्यांचं ज्या पद्धतीने वर्णन केलं होतं ते एकूण फारसं खाण्याची इच्छाच झाली नाही.' असं त्या म्हणाल्या.


हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मृणाल यांच्या या मुलाखतीची सध्या भलतीच चर्चा आहे. त्यांनी किडे कसे खाल्ले हेच ऐकून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. दरम्यान, मृणाल कुलकर्णी जवळपास ९ वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन करत आहेत. या चित्रपटाचं नाव ‘फक्त महिलांसाठी’ असं आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्री महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.