मुंबई ः लॉकडाऊनमुळे गेले तीन- चार महिने अनेक चित्रपटांचे शूटिंग अर्धवट राहिले होते. आता हळूहळू त्या सर्व चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात होऊ लागलेली पाहायला मिळत आहे. यातील एक चित्रपट म्हणजे "मिस मसाला डोसा." या चित्रपटाच्या टीमने राज्य सरकारने दिलेल्या सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले. या चित्रपटात मराठी अभिनेत्री मृण्मयी कोलवलकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारीत आहे.
दिग्दर्शक गिरीश वसईकर यांच्या 'मिस मॅच' या चित्रपटातून मृण्मयीला ब्रेक मिळाला. त्यानंतर 'स्टार प्लस' वाहिनीवरील 'कुल्फी कुमार बाजेवाला' या मालिकेत तिने काम केले. यामध्ये मिटी नावाची व्यक्तिरेखा तिने साकारली. बालाजी वर्ल्डच्या 'पंच बीट' या वेबसिरीजमध्येही तिने काम केले. यात सुश्मिता सेनने 'में हूँ ना'मध्ये जशी एका ग्लॅमरस टीचरची भूमिका केली होती, तशीच भूमिका तिने साकारली आहे. तसेच 'एन्काउंटर' या हिंदी चित्रपटात तिने काम केले आहे. दिग्दर्शक आलोक श्रीवास्तव यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'मिस मसाला डोसा' या चित्रपटाच्या शूटिंगचे काम सध्या ती करीत आहे.
"मिस मसाला डोसा" ही महाविद्यालयीन विद्यार्थिनीची कथा आहे. हिमाचल प्रदेशातील पालमपूरमधील एका प्राध्यापकाची प्रेमकथा आहे. या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे चित्रीकरण शिमला व इतर भागांमध्ये झाले होते. परंतु कोरोनामुळे आता त्यांना मुंबईतच शिमला पोलिस स्टेशनचा हा सेट तयार करावा लागला आहे आणि त्याच्या शूटिंगला मुंबईत पुन्हा प्रारंभ झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मिती आलोक श्रीवास्तव यांची आहे तसेच जतीन उपाध्यायदेखील निर्माते आहेत. या चित्रपटात ओजस रावल, लव्हिना इसरानी, मन्नू पंजाबी आणि प्रशांत नारायणन, हितेन तेजवानी, अनिल धवन आदी कलाकार आहेत. चित्रपटाचे शूट लवकरच पूर्ण होऊन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.