काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा (Congress Bharat Jodo Yatra) एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. KGF-2 या सुपरहिट चित्रपटातील गाण्यांचा या व्हिडिओमध्ये वापर करण्यात आला आहे. याबाबत आता KGF-2 ची गाणी बनवणाऱ्या म्युझिक कंपनीनं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतरांवर गुन्हा दाखल केलाय.
बंगळुरूस्थित एमआरटी म्युझिकनं (Music Label MRT Music) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), सुप्रिया श्रीनाटे आणि जयराम रमेश यांच्याविरोधात कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दाखल केलाय. म्युझिक कंपनीनं आपल्या तक्रारीत म्हटलंय, 'सुपरहिट चित्रपट KGF-2 च्या गाण्यांचं कॉपीराइट त्यांच्याकडं आहे. कंपनीनं सर्व भाषांमधील गाण्यांच्या कॉपीराइटसाठी मोठी रक्कम गुंतवलीय. त्यामुळं कोणीही त्याचा वापर करू शकत नाही.'
एमआरटी म्युझिकच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसनं परवानगीशिवाय चित्रपटातील गाणी घेतली आहेत आणि त्याचा वापर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं मार्केटिंग व्हिडिओ बनवण्यासाठी केला आहे. एमआरटी म्युझिक कंपनीनं (MRT Music Company) राहुल गांधी, सुप्रिया श्रीनाटे आणि जयराम रमेश यांच्यासह काँग्रेसच्या तीन नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीनं त्यांच्यावर कलम 403 (मालमत्तेचा अप्रामाणिकपणे गैरवापर), 465 (बनावटीची शिक्षा), 120 (कारावासाची शिक्षा) कलम 34 (सामान्य हेतू) असे आरोप लावलेत आणि कॉपीराइट कायदा 1957 च्या कलम 63 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
एमआरटी म्युझिक कंपनीचे प्रतिनिधित्व करणारे वकील नरसिंहन संपत म्हणाले, 'एमआरटी म्युझिकच्या मालकीच्या कॉपीराइटचं उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, सुप्रिया श्रीनाटे आणि राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.