MS Dhoni: धोनीच्या चित्रपटात 'नयनतारा', साऊथमध्ये फुल टू धिंगाणा!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार माही अर्थात महेंद्र सिंग धोनी आता चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावणार आहे.
Dhoni & Nayanthara
Dhoni & Nayantharaesakal
Updated on

MS Dhoni New Films: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार माही अर्थात महेंद्र सिंग धोनी आता चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. दीड दशकांहून अधिक काळ ज्याच्या कॅप्टन्सीनं साऱ्या भारतवासीयांना आनंद दिला त्या धोनीच्या सेकंड इनिंगचे अनेकांनी स्वागत केले आहे. गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या सिक्रेट मिशनची चर्चा होती. अखेर त्यानं आपण चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

रिटायरमेंट नंतर धोनी चित्रपटात भूमिका करणार की काय अशी चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावरुन आता धोनीच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज वर्तवले आहेत. 2019 मध्ये धोनीनं स्वताचे एक प्रॉडक्शन हाऊस सुरु केले होते. त्याचे नाव धोनी एंटरटेनमेंट असे होते. त्यानंतर आता धोनीनं एक मोठा निर्णय घेतला आहे. तो एका चित्रपटामध्ये टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा समवेत दिसणार आहे.

काही मीडिया रिपोर्टसनुसार, धोनी हा तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यानं काही चित्रपट साईन केले आहे. धोनीच्या पहिल्या चित्रपटामध्ये नयनतारा काम करणार असल्यानं चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यावर अजुन अधिकृतरित्या नयनताराकडून कोणत्याही प्रकारची माहिती आलेली नाही. मात्र चाहत्यांना या चित्रपटाविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

Dhoni & Nayanthara
Ram Setu Trailer: 'भाऊ अंगावर आला काटा!' अक्षयच्या 'रामसेतू'च्या ट्रेलरनं वादळ

गेल्या वर्षी देखील धोनी आणि त्याच्या प्रॉडक्शन हाऊसची एक बातमी समोर आली होती. त्यात त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक अनाउसमेंट करण्यात आली होती. नयनतारा कुणा संजय नावाच्या व्यक्तिसोबत चित्रपट करणार असल्याची ती बातमी होती. मात्र त्यावरुन अभिनेत्रीनं आपण अजुन कोणत्याही प्रकारे करार केला नसल्याचे सांगितले होते.

Dhoni & Nayanthara
Amitabh Bachchan birthday: 'मग जन्मालाच का घातलं'?' वडिलांवरच बिग बी संतापले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.