Mukesh Khanna:'शक्तिमान'चा दिग्दर्शक हिंदू नाही म्हणून मुकेश खन्ना नाराज? पोस्ट करत स्पष्टच म्हणाले...

मुकेश खन्ना यांनी छोट्या पडद्यावर साकारलेला सुपरहिरो शक्तिमान आता सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहे. पण त्यावरनं आता एक नवीन वाद सुरु झाला आहे.
Mukesh Khanna clears rumor of him being unhappy with non hindu director working on shaktiman trilogy
Mukesh Khanna clears rumor of him being unhappy with non hindu director working on shaktiman trilogyGoogle
Updated on

Shaktiman: या वर्षाच्या सुरुवातीला सोनी पिक्चर्सने एका छोट्या व्हिडीओतून एक मोठी घोषणा केली होती ज्याची खूप चर्चा रंगली. या व्हिडीओतून जाहीर करण्यात आलं होतं की भारतीय सुपरहिरो शक्तिंमान आता लवकरच मोठ्या पडद्यावर भेटीस येणार आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून ,टी.व्हीवर पहिल्यांदा शक्तिमान म्हणून भेटीस आलेले मुकेश खन्ना आणि त्यांची कंपनी देखील जोडली गेली आहे. सिनेमाच्या घोषणेसोबत हे देखील सांगितले गेले होते की या सिनेमात बॉलीवूडच्या बड्या अभिनेत्याला सामिल केलं जाईल. (Mukesh Khanna clears rumor of him being unhappy with non hindu director working on shaktiman trilogy)

Mukesh Khanna clears rumor of him being unhappy with non hindu director working on shaktiman trilogy
Video: प्राजक्ताचं 'बकासन',हातांवर पेलून धरलं सर्वांग; पण ट्रोलर्स म्हणाले,'आधी...'

काही दिवसानंतर बातमी समोर आली होती की मेकर्स रणवीर सिंगला सिनेमात घेऊ इच्छित आहेत,त्यासंदर्भात रणवीरसोबत बोलणी देखील सुरू असल्याचं कळलं होतं. पण या रिपोर्ट्स संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समजलेली नाही. पण रणवीर सिंगचे नाव शक्तीमानशी जोडले गेल्याने लोकांमध्ये मात्र उत्सुकता वाढली आहे,खासकरुन अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये. पण त्यानंतर आणखी एक मोठा प्रश्न लोकांच्या मनात उठलेला तो म्हणजे सिनेमाचा दिग्दर्शक कोण असेल?

Mukesh Khanna clears rumor of him being unhappy with non hindu director working on shaktiman trilogy
Prajakta Mali: 'जेव्हा तुमच्या क्रशसोबत तुमचं लग्न होतं..', प्राजक्ताच्या पोस्टनं वेधलं लक्ष

काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं होतं की २०२१ मध्ये आलेला मल्याळम सुपरहिरो सिनेमा 'मिन्नल मुरली' ने संपूर्ण भारतातील प्रेक्षकांचे मन जिंकले होते, म्हणून त्याला दिग्दर्शित करणाऱ्या बेसिल जोसेफला शक्तिमान सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. यावर कोणती अधिकृत माहिती समोर येण्याआधी सोशल मीडियावर एक ट्वीट केलं गेलं की मुकेश खन्ना शक्तीमानचा दिग्दर्शक हिंदू नाही म्हणून नाराज आहेत. कारण सिनेमात खूप गोष्टी हिंदू परंपरेला धरून दाखवल्या जातील जसं शक्तीमान मध्ये दाखवल्या गेल्या होत्या,ज्या केवळ एका हिंदू दिग्दर्शकाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. पण हे खरंच सत्य आहे का? आता शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी यावर आपली खरी बाजू मांडली आहे.

Mukesh Khanna clears rumor of him being unhappy with non hindu director working on shaktiman trilogy
Money Laundring Case: दिवाळीचा मुहूर्त जॅकलिनसाठी ठरेल का लकी? अभिनेत्रीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

मुकेश खन्ना यांनी ऑफिशिअल इन्स्टाग्राम हॅंडलवर शक्तिमान मधील एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की,''हे अशा पद्धतीनं जे आरोप माझ्यावर केले गेलेयत त्यानं मला खरंच मानसिक त्रास झाला आहे''. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,''शक्तिमान सिनेमा कोण दिग्दर्शित करेल याविषयी सध्या बोलणं खूप घाईचं होईल. माझे निर्माते आणि मी याविषयी विचार करत आहोत. पण एक दिग्दर्शक हिंदू नाही यावरनं जे काही मुद्दे उठवले जात आहेत हे खूपच विचित्र आहे. एक ट्वीट केलं आहे ज्यात लिहिलं आहे की शक्तिमानचा दिग्दर्शक हिंदू नाही म्हणून मी नाराज आहे. पण मला इथे हे स्पष्ट करायला आवडेल की,मी असं काहीही बोललेलो नाही. मला माहितही नाही हे कुणी आणि कुठल्या आधारावर सर्वत्र पसरवलं आहे. यात काहीच तथ्य नाही''.

मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, ''टॅलेंट म्हत्त्वाचं, ना की धर्म. शक्तिमान भारताला रिप्रेझेंट करणार आहे ना कोणत्या धर्माला. मी कलेचा,ज्ञानाचा आदर करतो. त्यामुळे कोणीही असं माझ्याविषयी चुकीचं बोलत असेल ते मुद्दामहून करत आहे. त्याला कशाचाच आधार नाही. मी शक्तिमानच्या चाहत्यांना विनंती करतो की कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका,जी माझ्याकडून किंव माझ्या निर्मात्याकडून तुमच्यापर्यंत आलेली नाही. आम्ही कोणालाच अद्याप साइन केलेलं नाही. शक्तिमान भारताचे नेतृत्व करणार आहे अशा कोणत्याही छोट्या-मोठ्या अफवेपेक्षा तो कितीतरी मोठा विषय आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.