Annapoorani: आव्हाड बोलून गेले पण नयनताराच्या अन्नपूर्णानी विरोधात गुन्हा दाखल! काय आहे प्रकरण?

नयनताराच्या 'अन्नपूर्णानी' चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Annapoorani  Movie
Annapoorani Movie Esakal
Updated on

Annapoorani: गेल्या काही दिवसांपासून साउथ लेडी सुपरस्टार नयनतारा ही तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी तिचा 'अन्नपूर्णानी' हा सिनेमा रिलिज झाला. सध्या या सिनेमाला प्रेक्षकांचे खुप प्रेम मिळत आहे. मात्र दुसरीकडे या चित्रपटामुळे बरेच वादही सुरु झाले आहेत.

या सिनेमात श्री रामाने वनवासात असताना मांसाहार केला होता असे सांगण्यात आले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील या सिनेमाचा संदर्भ आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर पुन्हा या सिनेमाची चर्चा सुरु झाली होती

आता नयनताराच्या 'अन्नपूर्णानी' चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही तर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर देखील नोंदवला आहे. शिवसेनेचे माजी नेते रमेश सोलंकी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. निर्मात्यांनी भगवान रामाचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी या तक्रारीत केला आहे.

Annapoorani  Movie
Aishwarya Rai VIdeo: घटस्फोटाच्या चर्चांना ऐश्वर्याने लावला पूर्णविराम! बच्चन कुटूंबाचा व्हिडिओ व्हायरल

हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देतो असा आरोप करत रमेश सोलंकी यांनी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कठोर कारवाई करण्याची आणि चित्रपटाच्या निर्मात्यांवर तसेच नेटफ्लिक्स इंडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मविरोधात एफआयआर नोंदवण्याची विनंती केली.

याबाबत त्यांनी काही ट्विटही केले होते. यात त्यांनी लिहिले, 'ज्या वेळी संपूर्ण जगात भगवान श्री राम मंदिराच्या अभिषेकामुळे आनंदाचे वातावरण आहे. अशा वेळी झी स्टुडिओ, नाद स्टुडिओ आणि ट्रायडेंट आर्ट्स निर्मित नेटफ्लिक्सवर अन्नपूर्णानी हा हिंदूविरोधी चित्रपट प्रदर्शित केला आहे. चित्रपटात एका हिंदू धर्मगुरूची मुलगी बिर्याणी शिजवताना अन् नमाज पठण करताना दिसत आहे. या चित्रपटात लव्ह जिहादचे प्रमोशन करण्यात आले आहे.

भगवान श्रीराम हे देखील मांसाहारी असे सांगून अभिनेता फरहान अभिनेत्रीला मांस खाण्यास प्रवृत्त करतो. अभिनेत्रीचे वडील एका मंदिराचे पुजारी आहेत जे भगवान विष्णूला नैवेद्य करतात मात्र त्यांची मुलगी चित्रपटात मांस शिजवते, मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडते, रमजान इफ्तारसाठी जाऊन नमाज पठण करते. मी #AntiHinduZee आणि #AntiHinduNetflix विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.'

Annapoorani  Movie
Vijay Setupathi Birthday: 'मला साधं समजू नका, वेळ आली तर मी...' विजय सेतुपतीनं स्पष्टपणे सांगितलं

तर दाखल केलेल्या तक्रारीचे फोटो शेयर करत त्यांनी लिहिले की, 'नेटफ्लिक्स इंडिया आणि झी स्टुडिओजने जाणूनबुजून हिंदूंच्या भावना दुखावल्यात यासाठी हा सिनेमा बनवला आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मी मुंबई पोलिस, मुख्यमंत्र्यांना या व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची विनंती करतो.'

इतकंच नाही तर त्यांनी 'अन्नपूर्णानी'चे दिग्दर्शक नीलेश कृष्णा, अभिनेत्री नयनतारा, निर्माते जतिन सेठी, आर रवींद्रन आणि पुनित गोएंका, झी स्टुडिओचे अधिकारी शारिक पटेल आणि नेटफ्लिक्स इंडियाच्या प्रमुख मोनिका यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.