Munna Bhai 3: 'मुन्नाभाई MBBS 3' बाबत सर्किटने दिली मोठी अपडेट...
Munna Bhai 3: मुन्ना भाई ही सिरिज प्रेक्षकांच्या खुप आवडीची आहे. 2003 मध्ये 'मुन्ना भाई एमबीबीएस' आली . जिने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमानं प्रेक्षकांना पार वेड करुन सोडलं होतं. त्यानंतर या चित्रपटाचा पुढचा भाग 2006 मध्ये 'लगे रहो मुन्ना भाई' आला. त्यानेही प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन केले.
त्यातली मुन्ना आणि सर्किटची जोडी प्रेक्षकांना ईतकी भावली की आजही या जोडीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. आता या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजे मुन्नाभाई MBBS 3 लवकरच येणार अशी अपेक्षा मुन्ना आणि सर्किटचे चाहते करत आहे.
या तिसऱ्या भागाबद्दल चर्चाही रंगली होती. 'मुन्ना भाई चले अमेरिका' असं नावही समोर आलं होतं. या नावामुळे आता मुन्ना आणि सर्किटची जोडी अमेरिकेत धुमाकूळ घालणार आहे, असं प्रेक्षकांना वाटलं होते.
मात्र त्यानंतर या चित्रपटाबाबत पुढे काहीच अपडेट आली नाही. त्यामुळे चाहते काहीसे प्रतिक्षेत होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्शद वारसीने 'मुन्नाभाई 3' बाबत अनेक खुलासे केले आहेत.
या चित्रपटतील मुख्य भुमिकेत असलेला सर्किट म्हणजेच अर्शद वारसी यांनी सांगितले की, या चित्रपटाबाबत सर्व काही तयार आहे, मात्र त्यावर काम सुरू करण्यात आलेले नाही. कदाचित मुन्नाभाई 3 बनू शकत नाही.
या बाबात बोलतांना अर्शद म्हणाला की, सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे त्यांना मुन्नाभाई 3 बनवायचा आहे. त्याच्याकडे निर्माता आहे ज्याला तो बनवायचा आहे. प्रेक्षक आहे ज्यांना तो सिनेमा पाहायचा आहे आणि त्या चित्रपटात काम करणारे कलाकारही आहेत. तरीही हा चित्रपट तयार होत नाही आहे.
राजकुमार हिराणी यांच्याबद्दल बोलतांना तो म्हणाला की, "तो राजू आहे... तो नंबर वन परफेक्शनिस्ट आहे. त्याच्याकडे सध्या तीन स्क्रिप्ट आहेत पण तिन्हींमध्ये काहीतरी गडबड आहे. त्यामुळे ते काम पुढे सुरु होत नाही आहे.
100 ते 200 टक्के खात्री झाल्याशिवाय तो पुढे सरकणार नाही. जोपर्यंत तो स्क्रिप्ट पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत तो चित्रपट सुरू करणार नाही". त्यामुळे आता पुन्हा या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. आता प्रेक्षकांना या चित्रपटासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.