Oscars 2023: 'नाटू नाटू' ला ऑस्कर अन् भारतात आनंदाला पूर.. पुरस्कार मिळाल्यावर काय म्हणाले संगीतकार एम एम कीरावानी?.

गोल्डन ग्लोब पटकावल्यानंतर आता आरआर आरनं ऑस्करवरही आपलं नाव कोरलं आहे.
Music Composer M.M.Keeravani speech after Natu Natu creats History,wins oscar
Music Composer M.M.Keeravani speech after Natu Natu creats History,wins oscarGoogle
Updated on

Oscars 2023: अखेर ज्या क्षणाची आपण प्रतिक्षा करत होतो तो क्षण भारतीयांच्या वाट्याला आलाच. मानाचा समजला जाणारा ऑस्कर अखेर आरआरआर मधील 'नाटू नाटू' गाण्याला मिळालाच.. अन् मग काय केवळ लॉस एंजेलिस मधल्या त्या सभागृहातच नाही तर सबंध भारतात आनंदाला पूर आलेला दिसत आहे.

राजामौली यांच्या आरआरआर मधील 'नाटू नाटू' गाण्यानं बेस्ट ओरिजनल सॉंग कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.

आधी गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड आणि आता ऑस्कर...यापेक्षा मोठा आनंद सध्या भारतीय कलाप्रेमींसाठी काय असू शकतो.(Natu natu win oscar m.m.keeravani speech)

Music Composer M.M.Keeravani speech after Natu Natu creats History,wins oscar
Oscars 2023 Live: अँड द ऑस्कर गोज टू.. RRR चित्रपटातील Natu Natu गाण्याला ऑस्कर, टाळ्या आणि शिट्ट्या

एमएम कीरावानी यांनी ऑस्करच्या स्टेजवर आपलं गाणं गात मनातील भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले-''हे सगळं शक्य करण्यासाठी खूप खूप आभारी''. त्यांनी आपल्या भाषणात टीममधील प्रत्येकाचे आभार मानले. कीरावानी जेव्हा स्पीच देते होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.

तर दुसरीकडे ऑस्कर मंचावर गायक काल भैरव आणि हालु सिप्लिगंज यांनी 'नाटू नाटू' गाण्यावर लाइव्ह परफॉर्मन्स दिला. या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन अमेरिकेत लॉस एंजलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये करण्यात आलं होतं.

Music Composer M.M.Keeravani speech after Natu Natu creats History,wins oscar
Oscars 2023: नाटू नाटू गाण्याविषयी माहित नाहीय?.. दीपिकानं थोडक्यात मांडला RRR चा इतिहास अन् सभागृह गेलं दणाणून..

आरआरआर चा डंका भारतातच नाही तर परदेशातही वाजला. राजामौली यांच्या या सिनेमानं भारतात तब्बल ७५० करोडची कमाई केली होती त जगभरात ११०० करोड कमावले होते.

या सिनेमात ज्यूनियर एनटीआर, रामचरण यांच्या मुख्य भूमिका होत्या. अजय देवगण, आलिया भट्ट यांनी सिनेमात कॅमियो साकारले होते. 'नाटू नाटू' गाण्याला संगीतकार एमएम कीरावानी यांनी संगीत दिलं होतं.

८० व्या गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड्स मध्ये नाटू नाटू गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर स्पीच देताना कीरावानी भावूक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.