मुंबई : जगविख्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांनी बॉलिवूड संदर्भात एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिलीय. माझ्या विरोधात बॉलिवूडमध्ये गैरसमज पसरवणारी टोळी काम करत आहे, असं सांगून त्यांनी सगळ्यांनाच धक्का दिलाय. मुळात सुशांतसिंग रजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि गटबाजीचे आरोप सुरू झाले आहेत. त्यात आता रेहमान वक्तव्यानं आणखीनच खळबळ उडाली आहे.
मनोरंजन जगतातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सुशांतसिंग रजपूतचा दिल बेचारा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. या सिनेमाला ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलंय. हॉटस्टारवर रिलीज झालेल्या या सिनेमावर सुशांतच्या चाहत्यांच्या अक्षरशः उड्या पडल्या. सिनेमाला चांगला रिस्पॉन्स मिळालाय. यानिमित्तानं रेहमान यांची एका रेडिओ चॅनेलवर मुलाखत घेण्यात आली. त्यात त्यांनी हिंदी सिनेमा अर्थात बॉलिवूडविषयी काही खळबळजनक विधानं करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या मुलाखतीत रेहमान यांनी म्हटलंय की, मी हिंदी सिनेमासाठी काम करत नाही, असं नाही. पण, हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गट माझ्या विरोधात गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत. एक गॅग केवळ हेच काम करत आहे. मी कधीही चांगल्या सिनेमाला नाही म्हणत नाही.
रेहमान यांनी मुलाखतीमध्ये दिल बेचाराचा दिग्दर्शक मुकेश छाबरा याचा रेफरन्स दिलाय. मुकेशशी चर्चा करताना, बॉलिवूडमधील काही गोष्टी उघड होत गेल्याचं रेहमान यांनी सांगितलं. रेहमान म्हणाले, 'मी मुकेशला दोन दिवसांत चार गाणी करून दिली होती. त्यानंतर मुकेश म्हणाला, 'इंडस्ट्रीतील अनेकजण मला सांगत होते की, तू त्यांच्याकडे (रेहमान यांच्याकडे) जाऊन नको.' मुकेशच्या सांगण्यानंतर माझ्या लक्षात आलं की, माझ्याकडं हिंदीचं काम कमी का झालंय. मला चांगले सिनेमे मिळणं बंद का झालंय? याचा उलगडा मला त्यावेळी झाला. काही लोक माझ्याविरोधात काम करत आहेत, हे माहिती नसल्यामुळं मी ऑफर येतील ते सिनेमे करत आहे.'
अजरामर संगीत
ए. आर. रेहमान यांनी हिंदी सिनेमामध्ये लगान, गुरू, जोधा-अकबर, दिल से, रॉकस्टार, स्वदेस, अशा सुपरहिट सिनेमांना संगीत दिलंय. या सिनेमांच्या यशात रेहमान यांच्या संगीताचा खूप मोठा वाटा आहे. रॉकस्टार, मोहेंजो दरो, मॉम, संजू सारख्या सिनेमानंतर बॉलिवूडमध्ये रेहमान यांचं काम दिसत नव्हतं. प्रदीर्घ कालावधीनंतर रेहमान यांनी दिल बेचाराच्या माध्यमातून एका हिंदी सिनेमाला पूर्ण संगीत देण्याचं काम केलंय. त्यामुळं रेहमान यांच्या आरोपांकडं गांभीर्यानं पाहिलं जातंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.