The Kerala Story UK Screening News: द केरळ स्टोरी सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच चर्चेत आहे. द केरळ स्टोरी सिनेमावर अनेक बऱ्या वाईट प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच The Kerala Story सिनेमासंबंधी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय.
UK मध्ये The Kerala Story च्या स्क्रीनिंग दरम्यान मोठा राडा झालाय. एका मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्याने UK मध्ये स्क्रीनिंग दरम्यान एक थिएटरमध्ये मोठ्या आवाजात ओरडून धुडगूस घातलाय.
(Muslim activists disrupt The Kerala Story screening in UK, engage in heated argument with viewers video viral )
काय आहे प्रकरण जाणून घेऊया?
आता The Kerala Story चित्रपटाच्या यूके स्क्रिनिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
सध्या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये शकील अफसरच्या नेतृत्वाखाली मुस्लिम कार्यकर्ते सिनेमाच्या शोमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे मुस्लिम कार्यकर्ते बर्मिंगहॅममधील थिएटरमध्ये प्रवेश करताना, ओरडताना आणि प्रेक्षकांना धमकावताना दिसतात.
मात्र, प्रेक्षकांनी घाबरून जाण्यास बाहेर जाण्यास नकार दिला. उलट थिएटरमधील प्रेक्षक कार्यकर्त्यांवर ओरडताना दिसले. शेवटी हे मुस्लिम कार्यकर्ते मागे हटले आणि त्यांना सिनेमागृहातून बाहेर काढण्यात आले.
20 मे रोजी, शकीलने ट्विटरवर चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ पुन्हा शेअर केला आणि लिहिले, "भाजप/हिंदुत्वाच्या अतिरेकी प्रचाराला यूकेमध्ये स्थान नाही." असं ट्विट करत शकीलने हा व्हिडिओ शेयर केलाय.
द केरळ स्टोरी 250 कोटींचा आकडा सहज गाठेल असे म्हणता येईल. त्यातच लवकरच द केरळ स्टोरी हा वर्षातील दुसरा सर्वात मोठा बॉलीवूड चित्रपट बनेल.
'द केरळ स्टोरी' याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. तर कलाकारांबद्दल सांगायचं झाल तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.