Naal 2: छोट्या चिमीचा शोध कसा लागला? शुटींगमध्ये तिने किरकिर केली? नाळ 2 च्या दिग्दर्शकाचा खुलासा

नाळ भाग 2 मधल्या छोट्या चिमीचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय
naal 2 director sudhakar reddy yakkanti revealed audition about chimi actress trisha thosar
naal 2 director sudhakar reddy yakkanti revealed audition about chimi actress trisha thosar SAKAL
Updated on

Naal 2 News: नाळ 2 सिनेमा काल संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालाय. नाळ 2 चं दिग्दर्शन केलंय सुधाकर रेड्डी यंकट्टी. सुधाकर यांनी दिग्दर्शित केलेल्या नाळच्या पहिल्या भागाचं खुप कौतुक झालं.

नाळ भाग 2 चं सुद्धा खुप कौतुक होतंय. सुधाकर यांनी अत्यंत सुंदरपणे नाळ भाग 2 ची कथा गुंफली आहे. नाळ चा पहिला भाग छोट्या चैत्याने गाजवला. तर नाळ च्या दुसऱ्या भागात चिमीचं कौतुक होतंय. छोटी चिमी कशी सापडली? तिने शूटींग करताना किरकिर केली का? अशा सर्व गोष्टींचा खुलासा दिग्दर्शकाने केलाय.

naal 2 director sudhakar reddy yakkanti revealed audition about chimi actress trisha thosar
Naal 2 Review: उसवलेल्या नात्यांची वीण घट्ट करणारा 'नाळ भाग 2', वाचा कसा आहे सिनेमा

चिमीची भुमिका साकारलीय बालकलाकार त्रिशा ठोसर. नटखट, मस्तीखोर त्रिशाबद्दल दिग्दर्शकाने खास खुलासा केलाय.

त्रिशाच्या निवडीबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणतात, ''मी, नागराज मंजुळे आणि आमची टीम चित्रपटासाठी कलाकारांची निवड करतो. ज्यावेळी 'चिमी'ची व्यक्तिरेखा लिहिली गेली आणि तिचा शोध सुरु झाला त्यावेळी आम्ही वयाची मर्यादा ठेवली नाही. आमच्या डोक्यात एकच होते ती मुलगी जितकी लहान असेल तितके उत्तम. त्या दृष्टीने आमचे शोधकार्य सुरु होते. अनेक ऑडिशन्स आल्या. मग पुढे आमच्या टीमने त्रिशाची ॲाडिशन घेतली.

सुधाकर पुढे म्हणतात, "आम्हाला सगळ्यांनाच ती आवडली. म्हणून आमच्या टीममधून काही जण दोन दिवस तिच्या घरी दिवसभर जायचे आणि तिचे ऑडिशन घ्यायचे. ती कशी वावरते, बोलते या सगळ्याचे निरीक्षण केले आणि आम्हाला आमची 'चिमी' सापडली. त्यावेळी ती फक्त साडेतीन वर्षांची होती. त्रिशा अतिशय गुणी मुलगी आहे. इतकी लहान असूनही कधी तिने किरकिर केली नाही."

सुधाकर शेवटी सांगतात, "आम्हाला कधी कधी वाटायचे दिवसभर चित्रीकरण ही करू शकेल ना ? परंतु त्रिशा नेहमीच उत्साही असायची. संवादाचे 'गिव्ह अँड टेक'ही तिने पटकन आत्मसात केले. तिचे पाठांतर अतिशय उत्तम आहे. सेटवर त्रिशा सगळ्यांचीच लाडकी होती. आम्ही तिचा चौथा वाढदिवसही सेटवर साजरा केला होता.''

नाळ भाग 2 चित्रपटात श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.