Naal 2 Marathi Movie Trailer : नागराजच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'नाळ २' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या नाळ या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
Naal 2 Marathi Movie Official Trailer Nagraj Manjule Director
Naal 2 Marathi Movie Official Trailer Nagraj Manjule Director esakal
Updated on

Naal 2 Marathi Movie Official Trailer Nagraj Manjule Director : मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या नाळ या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसादही मोठा होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या दुसऱ्या भागाची चाहत्यांना, प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

२०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. त्या इवल्याशा गोड 'चैतू'ने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मात्र ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तेव्हा न उलगडलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता 'नाळ भाग २'मध्ये मिळणार आहेत.

मोबाईलवरील 'व्हिडिओ अ‍ॅडिक्शन' मुळे ५ वर्षाच्या मुलामध्ये 'ऑटीझम' ची लक्षणे

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २' दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर झळकले आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

'नाळ'मध्ये खऱ्या आईकडे निघालेला चैतू, त्याच्या खऱ्या आईकडे पोहोचणार का? त्यांच्यातील अबोला दूर होणार का, याचे उत्तर आपल्याला 'नाळ भाग २'मध्ये मिळणार आहे. 'नाळ भाग २'चे ट्रेलरही उत्कंठा वाढवणारे आहे. ट्रेलर पाहाता हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होणार असल्याचे दिसतेय. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात चित्रीकरण स्थळही एक व्यक्तिरेखा साकारत असते. याचा प्रत्यय 'नाळ भाग २'मध्येही येत आहे.

ज्याप्रमाणे कलाकार इतक्या ताकदीचे दिसत आहेत, तितकेच चित्रीकरण स्थळही महत्वाची भूमिका बजावत आहे. नदी, दऱ्या, डोंगर, घरे असे निसर्गसौंदर्य चित्रपटात अतिशय सुरेखरित्या टिपण्यात आल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये विशेष लक्ष वेधत आहे ते चिमुकल्या गोंडस चिमीकडे. तिची निरागसता प्रेक्षकांना मोहणारी आहे. ज्याप्रमाणे 'नाळ'हा भावनिक, कौटुंबिक चित्रपट होता, तसाच 'नाळ भाग २'ही आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणतात, 'नाळ ची कथा जिथे थांबते तिथून पुढे 'नाळ भाग २'ची कथा सुरु होते. नात्यांना जोडणारी, घट्ट बांधणारी ही कथा आहे. आम्हाला खात्री आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुमच्यासोबत आमची नाळ जोडली जाणारा आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना कल्पना आली असेलच. त्यामुळे मी मनापासून प्रेक्षकांना सांगतो, हा 'नाळ भाग २' चित्रपटगृहात आवर्जून पाहा.'

Naal 2 Marathi Movie Official Trailer Nagraj Manjule Director
Naal 2 Teaser: "मला लई राग आला होता", नाळ चित्रपटाचा टीझर पाहून जितेंद्र जोशीची प्रतिक्रिया चर्चेत

बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, '' छोट्याशा गावातील छोटीशी ही कथा आहे. जी मनाला स्पर्शून जाणारी आहे. गावाकडची ओढ लावणारा, आपल्याला गावाच्या प्रेमात पाडणारा हा चित्रपट आहे. 'नाळ'मधील एवढासा चैतू आता मोठा झाला आहे. त्याचाही परिपक्व अभिनय दिसेल. मात्र यातील चिमी ही सगळ्यात लहान आहे आणि तिने उत्तम अभिनय केला आहे. एकंदरच हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे दिवाळी गिफ्ट हॅम्पर आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.