Nagraj Manjule : 'नाळ'चा दुसरा भाग येतोय; नागराज मंजुळेंकडून चाहत्यांना पर्वणी

Nagraj Manjule
Nagraj Manjuleesakal
Updated on

मुंबईः नागराज मंजुळे पुन्हा एकदा नाळ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नाळ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येत असून १० नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होईल. सुधाकर रेड्डी यक्कंटी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाची प्रेक्षकांशी 'नाळ' जोडली गेली. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावरही आपले नाव कोरले. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांना राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्ण पदक, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. या चित्रपटाने दिवाळीतही चित्रपटगृहात 'हाउसफुल्ल'चे बोर्ड झळकवले.

Nagraj Manjule
"अजित पवार गटाने खोटी कागदपत्रं दिली, मृत व्यक्तींची..."; शरद पवार गटाच्या वकिलांनी मांडले ५ मुद्दे...

'नाळ भाग २'मध्ये कोण कोण कलाकार असणार, नेमके यात काय पाहायला मिळणार आणि चित्रपटातील गाणी कशी असणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये आता कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान, टीझरमधील छायाचित्रण बघून 'नाळ २'ही कमाल असणार यात शंकाच नाही. येत्या दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी हा 'नाळ भाग २' प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी अधिकच धमाकेदार असणार आहे.

नागराज मंजुळे हे मराठी चित्रपट क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. त्याच्या यापूर्वीच्या विविध कलाकृतींना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याच वर्षी नागराजचा घर बंदूक बिरयानी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याअगोदर त्यानं बिग बी अमिताभ बच्चन यांना घेऊन झुंड नावाचा चित्रपट केला होता. त्याचेही प्रेक्षकांनी, चाहत्यांनी कौतुक केले होते.

Nagraj Manjule
NCP Crisis : राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता; शरद पवार गटाने तातडीने घेतली 'ही' भूमिका

चित्रपटाविषयी दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंटी म्हणतात, '' माझ्या पहिल्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आई मुलाच्या नात्यातील खूप साधी अशी ही गोष्ट होती. आता हीच गोष्ट पुढे जाणार आहे. 'नाळ भाग २' ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, अशी आशा आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव खूपच अनोखा होता आणि आताही आहे.

नागराज मंजुळे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता या सगळ्याच भूमिकेत अव्वल आहेत आणि झी स्टुडिओजबद्दल सांगायचे तर त्यांनी आजपर्यंत मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या दोघांबरोबर आता माझीही ‘नाळ’ जोडली गेली आहे. चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे आणि चैत्या त्याच्या खऱ्या आईकडे निघाला आहे, आता त्याचा हा प्रवास त्याला कुठे नेणार, याचे उत्तर लवकरच चित्रपटगृहात मिळणार आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.