टॉलीवूडचा सुपरस्टार नागार्जुन पडला होता या बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमात..

अभिनेता नागार्जुनचा आज वाढदिवस, त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक अक्षरशः वेडे आहेत.
Nagarjuna Birthday
Nagarjuna Birthdaysakal
Updated on

Nagarjuna Birthday : अभिनेता नागार्जुन केवळ टॉलीवुडलाच परिचित नाहीत तर आगामी हिंदीत आणि मराठीत त्यांचे चित्रपट सर्वांना ठाऊक आहे. त्यांचे कित्येक डबिंग केलेले सिनेमे आजही टेलिव्हिजनवर लोक आवर्जून पाहतात. आपल्या अभिनयाने आणि दमदार शैलीने टॉलीवुडसह हिंदी चित्रपट विश्वातही त्यांनी एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आज 29 ऑगस्ट रोजी नागार्जुन यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील खास बात..

नागार्जुन अक्किनेनी हे साऊथ इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे. नागार्जुन केवळ अभिनेतेच नाही तर चित्रपट निर्माते आणि उद्योगपती देखील आहेत. त्यांचे वडील अक्किनेनी नागेश्वर देखील प्रसिद्ध अभिनेते होते. चित्रपट विश्वाची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातील असल्याने नागार्जुन यांना सुरुवातीपासूनच मनोरंजन विश्वाची ओढ होती. अगदी लहान वयातच त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली आणि बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट केले.

'विक्रम' हा नागार्जुन यांनी प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट. 1986 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, याच वर्षी नागार्जुन यांनी ‘कॅप्टन नागार्जुन’ आणि ‘अरण्यकांड’ या त्यांच्या दोन चित्रपटांमध्येही काम केले. या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यानंतर नागार्जुन यांनी अनेक सुपरहीट चित्रपट दिले.

नागार्जुन यांची पर्सनल लाईफ देखील एखाद्या चित्रपटासारखी आहे. 1984 मध्ये, त्यांनी निर्माते डी. रामनायडू यांची मुलगी लक्ष्मी दग्गुबतीशी विवाह केला. दोघांनाही नागा चैतन्य नावाचा मुलगा आहे. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. पुढे 1990 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर नागार्जुनने अभिनेत्री अमला अक्किनेनीशी लग्न केले. पण त्यांच्या आयुष्यातील अशी एक बाजू आहे जिथे ते लग्न झाल्यावरही प्रेमात पडले होते तेही चक्क बॉलीवुड अभिनेत्रीच्या प्रेमात. तिचे नाव होते तब्बू..

नागार्जुन आणि तब्बू यांच्या प्रेमाच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. एका चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची भेट झाली होती. दरम्यान, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी नागार्जुनचे लग्न झाले होते. पण, तरीही दोघांचे अफेअर सुरूच होते. असं म्हणतात, जवळपास 10 वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. पण, त्यांचे लग्न होऊ शकले नाही. नागार्जुन यांचे तब्बूवर खूप प्रेम होते, पण संसार मोडून लग्न करण्याची त्यांची तयारी नव्हती म्हणून ते एकमेकांपासून दूर गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()