Nagarjuna Sister: साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या बहिणीचं दुःखद निधन

नागार्जुनाच्या बहिणीचं दुःखद निधन झालंय
Nagarjuna Sister Naga Saroja Passed Away
Nagarjuna Sister Naga Saroja Passed AwaySAKAL
Updated on

Nagarjuna Sister Passed Away News: साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुनच्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागार्जुन यांची बहीण नागा सरोजा यांचे निधन झाले आहे.

नागा सरोज या बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरोज या दिग्गज अभिनेता अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या कन्या होत्या.

(Nagarjuna Sister Naga Saroja Passed Away)

Nagarjuna Sister Naga Saroja Passed Away
Bigg Boss 17 Elimination: पहिल्या आठवड्यातच कोणाचा पत्ता होणार कट? या स्पर्धकांचे झाले नॉमिनेशन

गेल्या अनेक दिवसांपासून नागार्जुन यांच्या बहिणीला श्वसनाचा त्रास होत होता. अखेर मंगळवार 17 ऑक्टोबर रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे अक्किनेनी यांच्या घरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. बहिणीच्या मृत्यूनंतर नागार्जुनचे कुटुंब शोकसागरात बुडाले होते.

नागा सरोजा ही अभिनेता नागार्जुनची मोठी बहीण होती. अक्किनेनी नागेश्वर राव यांना पाच मुले होती आणि नागा सरोजा ही तिसरी मुलगी होती. अक्किनेनी नागेश्वर राव यांना सत्यवती, नागा सुशीला, नागा सरोजा, वेंकट आणि नागार्जुन या तीन मुली आणि दोन मुलगे होते.

Nagarjuna Sister Naga Saroja Passed Away
Koffee with Karan seson 8 Teaser : ऐकलं का? तो पुन्हा येतोय, 'कॉफी विथ करण' ला नाही मरण, आठव्या सीझनचा पहिला गेस्ट कोण?

मनोरंजन विश्वापासून दूर होत्या नागा सरोज

नागार्जुनच्या घरातील तीनही पिढ्या चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. तेलगू चित्रपटसृष्टीत अक्किनेनी कुटुंबाने स्वतःचे वर्चस्व निर्माण केलंय.

नागेश्वर राव यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा धाकटा मुलगा नागार्जुनने पुढे चालू ठेवला आहे. नातू सुमंत, नागा चैतन्य, अखिल आणि सुशांत हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

कुटुंबातील बहुतांश सदस्य चित्रपटसृष्टीत असले तरी नागा सरोज सुरुवातीपासूनच इंडस्ट्रीपासून दूर होत्य. त्या फक्त कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावायच्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.