Nagraj Manjule: फॅन्ड्री, सैराट, नाळ, झुंड आदी दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून समाजातील वंचितांचे प्रश्न समोर आणणारे त्यावर सडेतोडपणे भाष्य करणारे एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणजे नागराज पोपटराव मंजुळे. लवकरच नागराज यांचा 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट रिलीज होणार आहे.
या चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर प्रमुख भूमिकेत आहे. विशेष म्हणजे एरव्ही पडद्यामागे असणारे नागराज या चित्रपटात फुल्ल दबंग भूमिकेत आहे. नागराज या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या निमित्ताने प्रमोशन करण्यासाठी नागराज आणि सायाजी आणि संपूर्ण टीम महाराष्ट्रभर फिरत आहे.
याच निमित्ताने नागराजने एका हॉटेलाचा फोटो शेयर केला आहे. हे हॉटेल 'सैराट' चित्रपटाच्या फॅनचे आहे, हा ते तुम्हाला नागराजचा फोटो पाहून कळेलच..
(Nagraj Manjule shared post photos about sairat ghar banduk birayani with sayaji shinde)
नागराज आणि सयाजी शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांना एक वाटेत एक हॉटेल लागले. जे खास बिर्याणी स्पेशल हॉटेल आहे. या हॉटेलचे नाव आहे 'सैराट बिर्याणी'. या हॉटेलचा मालक हा सैराट चित्रपटाचा फॅन असेल म्हणूनच त्याने 'सैराट' असे बिर्याणीचे नाव ठेवले आहे.
हा फोटो नागराजने शेयर केला कारण, सैराट आणि बिर्याणी असे दोन शब्द यात आहेत. 'सैराट' हा नागराजचा गाजलेला सिनेमा तर 'घर बंदूक बिरयानी' हा नागराजचा येऊ घातलेला सिनेमा. त्यामुळे हे बिर्याणीचे हॉटेल पाहून नागराजला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्याने आणि सयाजी शिंदे यांनी या 'सैराट बिर्याणी' बाहेर फोटो काढून ते लगेच शेयर केला.
नागराज यांनी चित्रपट विश्वात स्वतःचे नावच केले नाही तर एक इतिहास घडवला आहे. अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून नागराज इथवर पोहोचले आहेत. नागराजच्या 'घर बंदूक बिरयानी' मधून ते नव्या विषयाला वाचा फोडणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता कधी एकदा हा चित्रपट पाहतोय याची उत्कंठा चाहत्यांना लागली आहे. येत्या 7 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.