Nana Patekar : 'कुठून निवडणूक लढवू तुम्हीच सांगा, राजकारण हा...' नाना पाटेकरांनी पुन्हा सुनावले!

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे निवडणूकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
Nana Patekar Reaction
Nana Patekar Reaction esakal
Updated on

Nana Patekar Latest News: हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे निवडणूक लढवणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यावर त्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. ती चर्चेत आली आहे.

प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी मकरंद अनासपूरे यांनी म्हटले आहे की, निसर्गाचे भाकीत आपण करु शकत नाही. दुष्काळ हटविण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न होत आहेत. मात्र एक एनजीओ म्हणून आपली एक वेगळ्या प्रकारची भूमिका असते. हेही लक्षात घ्यायला हवे. असे अनासपूरे यांनी म्हटले आहे.

नाम फाउंडेशनला आता ९ वर्षे पूर्ण होतील. त्या निमित्तानं सांगावं वाटतं की, नाम फाउंडेशननं महाराष्ट्रातील एक हजारांहून अधिक गावांमध्ये पाण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र शासनासोबत काही महत्वांच्या कामांमध्ये सामंजस्य करार करण्यासाठी आम्ही नाम फाउंडेशनच्या वतीनं आलो आहोत. असेही मकरंद अनासपूरे यांनी म्हटले आहे. आम्हाला यावर्षी ३५० गावांमध्ये काम करायचे आहे. ५० लाख क्युबिक गाळ काढण्याचा निर्धार केला आहे.

Nana Patekar Reaction
Oscar Winner 2024 : अखेर 'ओपनहायमर'नं कोरलं 'ऑस्कर'वर नाव! 13 नॉमिनेशन, 7 पुरस्कारांवर उमटवली मोहोर

नाना पाटेकर म्हणाले की, मी कुठून निवडणूक लढवू हे तुम्हीच मला सांगा. राजकारण हा काही माझा पिंड नाही. मी राजकारण केले तर सध्या मी हाती जे काम घेतले आहे ते करता येणार नाही. मला खूपदा ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहे असे कळते आहे. पण राजकारण हा माझा प्रांत नाही. मी आता जे काम करतो आहे त्याचे समाधान मला राजकारणातून मिळेल का, मनात जे येईल ते आपण बोलून टाकतो, त्यामुळे मला नाही वाटतं की, मला तिकडे जाता येईल. अशा शब्दांत नानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Nana Patekar Reaction
Oscar Winner 2024 : 'ओपनहायमर' ठरला 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', सिलियन मर्फीला 'सर्वोत्कृष्ट अभिनया'साठी ऑस्कर! वाचा विजेत्यांची पूर्ण यादी

नानांनी माध्यमांशी संवाद साधताना आगामी काळातील त्यांच्या राजकीय प्रवेश, निवडणूक यावर दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय निवडणूकीवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्यावर आता त्यांनी पुन्हा एकदा परखडपणे त्यांची भूमिका मांडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()