Nana Patekar: "माझ्या अंत्यसंस्काराची लाकडं तयार आहेत", नाना पाटेकर यांनी मृत्यूविषयी केलं मोठं वक्तव्य

नाना पाटेकर यांनी त्यांच्या मृत्युविषयी मोठं विधान केलंय
nana patekar comment statement on his death funeral during the vaccine war trailer launch
nana patekar comment statement on his death funeral during the vaccine war trailer launchSAKAL
Updated on

Nana Patekar: नाना पाटेकर हे मराठी, हिंदीच नव्हे तर संपूर्ण भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. नाना पाटेकर सध्या मनोरंजन विश्वापासुन दूर राहून साधी राहणी जगत आहेत.

नाना पाटेकर यांचा बऱ्याच कालावधीनंतर द व्हॅक्सीन वॉर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नाना पाटेकर या सिनेमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. या निमित्ताने एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मृत्यूविषयी मोठा खुलासा केलाय.

(nana patekar comment statement on his death funeral during the vaccine war trailer launch)

nana patekar comment statement on his death funeral during the vaccine war trailer launch
Rupali Bhosle: "कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेता आलं नाही अन् आज", रुपालीला आला आदिशक्तीचा दिव्य अनुभव

माझ्या अंत्यसंस्काराची लाकडं तयार आहेत: नाना पाटेकर

नाना पाटेकरांनी एका मुलाखतीत खुलासा केला त्याप्रमाणे, नाना पाटेकर यांनी त्यांच्या मृत्युसाठी १२ मण लाकडे तयार ठेवली आहेत. ही १२ मण लाकडे सुकी आहेत. ओली लाकडे वापरल्याने खुप धूर होतो ज्यामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी येईल आणि ते माझ्यासाठी रडत आहेत असा अनेकांचा खोटा समज होईल. असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलं.

माझा फोटो लावू नका, मला विसरुन जा: नाना पाटेकर

नाना पाटेकर यांच्या कुटुंबात सात भावंडे होती. आता त्यापैकी एकही जण या जगात नाही. नाना पाटेकर आईवर प्रचंड प्रेम करायचे. परंतु काही वर्षांपुर्वी त्यांच्या आईचंही निधन झाल.

आता नाना पाटेकर कुटुंबात एकटे आहेत, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे निधनाच्या वेळी कोणताही गैरसमज न होता, माझा फोटोही कोणी लावू नये आणि पूर्ण विसरुन जावे, अशी नाना पाटेकरांची इच्छा आहे.

एकुणच नाना पाटेकरांच्या या विधानाची खुप चर्चा होतेय.

Related Stories

No stories found.