vikram gokhale: मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे काल शनिवार 26 ऑक्टोबर रोजी निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शोकाकुल झालेले अनेक कलाकार आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अशीच एक भावनिक पोस्ट ज्येष्ठ अभिनेते नाना पटेकर यांनी शेयर केली आहे.
(nana patekar emotional post for vikram gokhale )
विक्रम गोखले आणि नाना पाटेकर यांच्या मैत्रीचे नाते शब्दा पलीकडचे होते. त्यांची मैत्री आपण 2016 साली आलेल्या 'नटसम्राट' या चित्रपटातून पडद्यावरही अनुभवली. या चित्रपटात विक्रम गोखलेंचा अभिनय पाहून सारेच अवाक झाले होते. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. त्यामुळे विक्रम गोखले यांच्या निधनाने नानांना प्रचंड पोकळी जाणवत आहे. म्हणून आपल्या लाडक्या मित्राला त्यांनी अगदी मोजक्या आणि भावनिक शब्दात आदरांजली वाहिली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत नाना पाटेकर यांनी लिहीले आहे की, ''विक्रम मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो...असेन.. तुझ्यासारखा कलावंत आणि माणूस होणे नाही. अशा शब्दांत त्यांनी विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे.
विक्रम गोखले यांनी वयाच्या 26 व्या वर्षी 1971 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमात त्यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. विक्रम यांनी आजवर नाटक, मालिका, चित्रपट आणि विशेष म्हणजे बॉलीवुडमध्येही आपल्या अभिनयाचा दबदबा कायम ठेवला. जवळपास पन्नास वर्षे त्यांनी अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अनुभवाची इतकी संपन्नता असूनही ते प्रत्येकाशी आपुलकीने आणि वागायचे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.