Nana Patekar: "गेल्या ५० वर्षात मला एकानेही..." नाना पाटेकरांनी सांगितली मनातली खंत

नाना पाटेकर यांनी केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खंत व्यक्त केली
Nana Patekar heartfelt regret in international kerala film festival 2023
Nana Patekar heartfelt regret in international kerala film festival 2023SAKAL
Updated on

Nana Patekar News: नाना पाटेकर हे भारतीय मनोरंजन विश्वातील चर्चेतलं नाव. नाना पाटेकर यांनी गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

नाना पाटेकर यांचे परिंदा, वेलकम, सिंहासन, क्रांतीवीर, नटसम्राट, तडका, प्रहार अशा सिनेमांमध्ये काम करुन लोकांच्या मनावर राज्य केलं. अशातच नानांनी एका मुलाखतीत त्यांच्या मनातली खंत व्यक्त केली.

Nana Patekar heartfelt regret in international kerala film festival 2023
Virat - Anushka Wedding Anniversary: एकमेकांच्या प्रेमात पडण्याआधी 'या' गोष्टीवरुन विराट - अनुष्कामध्ये झालेलं भांडण

नाना पाटेकर केरळ आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी

नाना पाटेकर केरळच्या २८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी होते. तिथे ते म्हणाला, "येथे आल्याचा मला सन्मान वाटतो. मला IFFK साठी आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. मी 32 वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळमध्ये पहिल्यांदा आलो होतो. आजही केरळच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत काहीही बदललेले नाही. इथे राहणारे लोक त्यांच्या हृदयाने अधिक विचार करतात. त्यामुळे भाषा भिन्न असल्या तरी त्यांच्याशी संवाद साधणे सोपे जाते."

नाना पाटेकरांनी सांगितली मनातली खंत

आपल्या पाच दशकांच्या उत्कृष्ट कारकिर्दीत, नाना पाटेकर यांना मल्याळम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

नाना पाटेकर म्हणतात "गेल्या ५० वर्षांत मल्याळम इंडस्ट्रीधून एकाही दिग्दर्शकाने माझ्याशी संपर्क साधला नाही... याचा अर्थ एक अभिनेता म्हणून मला सुधारावे लागेल. मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करेन आणि तुम्हाला निराश करणार नाही," तो म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.