Nana Patekar: "माझ्या मुलाची लायकी असेल का?" बॉलिवूडच्या घराणेशाहीवर नाना पाटेकरांचा थेट निशाणा
नाना पाटेकर हे अनेक गोष्टींवर परखड भाष्य करत असतात. नाना पाटेकर यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये लक्षवेधी भुमिका साकारल्या आहेत.
नाना पाटेकर यांनी द व्हॅक्सीन वॉरच्या ट्रेलरच्या वेळी अनेक मुद्द्यांवर स्वतःची मत मांडलं आहे. नाना पाटेकर यांनी ट्रेलर लॉंचवेळी बॉलिवूडच्या घराणेशाहीवर भाष्य केलंय.
(nana patekar on bollywood nepotism)
नेपोटिझमवर नाना पाटेकर यांनी साधला निशाणा
द व्हॅक्सीन वॉर चा ट्रेलर लॉंचवेळी नाना पाटेकर यांनी बॉलिवूडच्या घराणेशाहीवर भाष्य केलंय. नाना पाटेकर म्हणतात, "आता मी अभिनेता आहे. उद्या मला माझ्या मुलाने अभिनेता व्हायचे आहे. पण त्याची खरंच लायकी आहे का. पण मला ते तुमच्यावर लादायचे आहे.
नाना पाटेकर पुढे म्हणतात, "त्याचा एक चित्रपट अयशस्वी होईल, नंतर आणखी दोन आणि नंतर 10 चित्रपट असतील. त्यानंतर तुम्हाला तो वाईट वाटणार नाही. आणि हळुहळू तुम्ही सुद्धा त्याला स्वीकारायला सुरुवात करा. आणि मग एक दिवस तो आपल्या डोक्यावर बसेल. अशी परिस्थिती सध्या आपल्याकडे आहे."
नाना पाटेकर यांचा गदर 2, जवान वर निशाणा?
द व्हॅक्सीन वॉरच्या ट्रेलरवेळी नाना पाटेकर यांनी अनेक विषयांवर मौन सोडलं. यावेळी जवान किंवा गदर 2 चे नाव न घेता नाना पाटेकर म्हणाले, "आजकाल लोक असे चित्रपट पाहतात किंवा त्यांना तसे सिनेमे पाहायला जबरदस्ती केली जाते. मी असे चित्रपट जास्त काळ सहन करू शकत नाही."
नाना पाटेकर पुढे म्हणाले, "मी काल खूप हिट चित्रपट पाहिला. पण तो चित्रपट पूर्ण पाहू शकलो नाही. पण तो सिनेमा खुप चालला यार. आता जेव्हा असा सिनेमा चालतो तेव्हा आम्हाला असे वाटते की, असे सिनेमे पुन्हा पुन्हा दाखवून आम्हाला ते आवडण्यास भाग पाडत आहेत."
द व्हॅक्सीन वॉर ची रिलीज डेट
विवेक अग्निहोत्री यांच्या या द व्हॅक्सीन वॉर चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय अभिनेत्री पल्लवी जोशी, गिरीजा ओक, रायमा सेन यांच्याही भूमिका यात आहेत.
हा चित्रपट याच महिन्यात २८ तारखेला प्रदर्शित होणार आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. खासकरुन त्यातील संवाद हे अतिशय बोलके आणि प्रभावी असल्याच्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.