नाना पाटेकर हे चित्रपटसृष्टीतील सर्वात अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत आणि हे नाकारता येणार नाही. हिन्दी, मराठी, नाटक, चित्रपट अशा अनेक माध्यमातून त्यांनी आपली अभिनयाची कारकीर्द संपन्न केली आहे. त्यांचे आज लाखों चाहते आहेत शिवाय त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चित्रपटांमधील आपल्या उत्कृष्ट अभिनयानंतर नाना आता वेब सिरीजच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यावर झालेल्या 'मी टू' आरोपानंतर प्रदर्शित होणारा हा त्यांचा पहिला प्रोजेक्ट आहे.
(Nana Patekar Returns To The Big Screen After Tanushree Dutta’s #MeToo Allegations, To Star In Prakash Jha’s Web Series)
अभिनेत्री तनुश्री दत्ताने 'MeToo' चळवळीदरम्यान एका चित्रपटाच्या सेटवर तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्यानंतर नाना पाटेकर यांच्यावर केला होता. त्यावेळी तिने केलेल्या आरोपांवर मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर नाना पाटेकर जवळपास तीन ते चार वर्षे कोणत्याही प्रोजेक्टमधून समोर आले नाहीत. पण आता मात्र त्यांनी दमदार कमबॅक केला आहे. पुन्हा एकदा नव्या अंदाजाने वेब सिरिजच्या माध्यमातून नाना पाटेकर आपल्या अभिनयाची छाप पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
'लाल बत्ती' या आगामी सामाजिक-राजकीय वेब सिरीजमध्ये नाना पाटेकर काम करणार आहे. विशेष म्हणजे, ही नानांची पहिली वेब सिरिज आहे. नानांचे चाहते डिजिटल क्षेत्रात त्याच्या पदार्पणाची वाट पाहत आहेत. ह्या निमित्ताने टी इच्छा पूर्ण झाली आहे. 'लाल बत्ती' ही प्रकाश झा यांची वेबसिरिज आहे.
नाना यामध्ये वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री मेघना मलिक, नाना पाटेकर यांच्या विरुद्ध भूमिकेत दिसणार आहे. त्या नानांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. मेघना मलिकने आधी कलर्स टीव्हीवरील शो 'ना आना इस देस लाडो' मध्ये 'आमाजी ची' दमदार भूमिका केली होती . 'लाल बत्ती’ ही नानांची प्रकाश झा सोबतची दुसरी कलाकृती आहे. यापूर्वी ‘राजनीती’ चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.