Nanded Hospital: संडास साफ करा, जात बघून सांगायचे तर.... केतकी काय बोलून गेली!

केतकी चितळेने नांदेड हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेवर भाष्य केलंय
nanded hospital deaths Shiv Sena MP makes dean of Nanded clean toilet actress ketaki chitale comment on cast issue
nanded hospital deaths Shiv Sena MP makes dean of Nanded clean toilet actress ketaki chitale comment on cast issue SAKAL
Updated on

Ketaki Chitale Post News: केतकी चितळे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. केतकी कायम राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर भाष्य करत असते.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रुग्ण व नवजात बालके दगावल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावले. या घटनेचा केतकीने सोशल मिडीयावर निषेध नोंदवलाय.

(nanded hospital deaths Shiv Sena MP makes dean of Nanded clean toilet actress ketaki chitale comment on cast issue)

nanded hospital deaths Shiv Sena MP makes dean of Nanded clean toilet actress ketaki chitale comment on cast issue
Bhau Kadam - Ashok Saraf: भाऊ कदमने अशोक मामांच्या पायावर घातलं लोटांगण! व्हिडिओला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद

नांदेड येथे घडलेल्या घटनेचा निषेध करत केतकी लिहीते, "आता एका हॉस्पिटल डीनला, हॉस्पिटलमधील संडास साफ करा हे ही त्याची जात बघून सांगायचे तर!!!

आणि तरीही राव आपल्याकडे खोट्या अट्रोसिटी केसेस टाकल्या जात नाहीत.

जय हो Atrocities Act, 1989. आम्ही सामान्य माणसांवर काय, तर आता कुठल्या पदालाही नाही सोडणार."

खासदार हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. या घटनेवरून राजकारण पेटलं असून विरोधकांकडून राज्य सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. यादरम्यान शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी काल या रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या डीनला टॉयलेट साफ करायला लावले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला. यानंतर आता खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवजात नुलगी आणि तिच्या आईच्या मृत्यूने खळबळ

नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि तिचाही मृत्यू झाला. महिलेचाही मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे महिलेचे नातेवाईक असलेल्या कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.