khupte tithe gupte: सध्या महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलाढाली सुरू आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा एक गट युतीमध्ये आहे तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडीमध्ये आहे.
त्यामुळे रोज त्यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोप आणि वादाच्या फैरी उडत असतात. त्यातही राणे आणि राऊत हा वाद सगळ्यांनाच माहीत आहे. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र संजय राऊत यांच्यावर टीका करत असतात, तर संजय राऊत राणे पिता पुत्रांवर तोंड सुख घेत असतात.
आता हाच वाद आता 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या मंचावर आला आहे. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.
(narayan rane slams sanjay raut in khupte tithe gupte show on zee marathi host by avdhoot gupte )
गायक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक अशा विविध भूमिका पार पडणारा अवधूत गुप्ते आपल्या भेटीला त्याचा 'खुपते तिथे गुप्ते' हा शो घेऊन आला आहे. या शो ची सध्या बरीच चर्चा आहे.
जवळपास 10 वर्षांनी हा मुलाखतीचा कार्यक्रम पुन्हा आला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तूफान फटकेबाजी केली. हा भाग चर्चेत असतानाच नवा प्रोमो समोर आला आहे.
'खुपते तिथे गुप्ते'च्या आगामी भागात भाजप नेते नारायण राणे हजेरी लावणार आहेत. त्यांचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.
यावेळी नारायण राणे यांना एक व्हिडिओ दाखवण्यात येतो. त्यामध्ये संजय राऊत म्हणतात, 'नारायण राणे हे केवळ पोपटासारखे बोलत असतात.. मागचा पुढचा विचार न करता..'
त्यावर नारायण राणे म्हणाले, 'संजय राऊत खासदार माझ्यामुळे झाला. मी त्याला खासदार केलं. नाहीतर हा खासदार झालाच नसता. मी तर म्हणतो, हे माझंच पाप आहे' अशी टीका नाराजी नारायण राणे यांनी व्यक्त केली. हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.