Naseeruddin Shah: माझी चूक झाली... अखेर नसिरुद्दीन शाहांनी मागितली मराठी माणसांची माफी

अखेर नसिरुद्दीन यांनी फेसबुकवर पोस्ट करून सर्वांची माफी मागितली.
Naseeruddin Shah apologized by facebook post for marathi language based on pharsi
Naseeruddin Shah apologized by facebook post for marathi language based on pharsiSAKAL
Updated on

Naseeruddin Shah Apologoized News: नसिरुद्दीन शाह सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी फिल्मफेअर ट्रॉफी मी माझ्या बाथरूमच्या कडीला अडकवल्या आहेत असं विधान केलं होतं. या विधानामुळे मोठा गदारोळ माजला होता.

याशिवाय मराठी आणि फारसी भाषेचा असलेला परस्परसंबंध नसिरुद्दीन शहांनी दाखवला होता. त्यावरून सुद्धा वाद झाला. पण अखेर नसिरुद्दीन यांनी फेसबुकवर पोस्ट करून सर्वांची माफी मागितली.

(Naseeruddin Shah apologized by facebook post for marathi language based on pharsi )

Naseeruddin Shah apologized by facebook post for marathi language based on pharsi
Kriti Sanon Om Raut: आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचवेळी क्रिती - ओम राऊतला गुडबाय किस पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल

नसिरुद्दीन लिहितात... " मी अलीकडे सांगितलेल्या गोष्टींवर दोन पूर्णपणे अनावश्यक वाद उफाळून आलेले दिसतात.. पाकिस्तानमधील सिंधी भाषेबद्दलच्या माझ्या चुकीच्या विधानाबद्दल एक. तिथे माझी चूक झाली.

मराठी आणि फारसी यांच्यातील नातेसंबंधांबद्दल मी जे बोलले आहे त्यावर दुसरे. माझे नेमके शब्द "बरेच मराठी शब्द मूळचे फारशी आहेत" असे होते.

माझा उद्देश मराठी भाषेचा ऱ्हास करण्याचा नव्हता तर उर्दू ही हिंदी फारसी तुर्की आणि अरबी भाषांचे मिश्रण असलेली विविधता सर्व संस्कृतींना कशी समृद्ध करते यावर बोलण्याचा होता.

इंग्रजीने हिंदुस्तानीचा उल्लेख न करण्यासाठी सर्व युरोपियन भाषांमधून शब्द घेतले आहेत आणि पृथ्वीवर बोलल्या जाणार्‍या प्रत्येक भाषेबद्दल ते खरे आहे असे मला वाटते." अशी पोस्ट नसिरुद्दीन यांनी केलीय.

Naseeruddin Shah apologized by facebook post for marathi language based on pharsi
Kapil Sharma with Aamir Khan: आमीरच्या घरी सजली मैफिल, कपिल शर्माच्या गाण्याने रंगला माहोल, व्हिडीओ व्हायरल

नसिरुद्दीन शाह यांचं विधान काय?

“मराठीतही बरेच फारसी शब्द आहेत, अशा शब्दांचा सर्रास वापर होतो. ‘आरसा’ हा फारसी शब्द आहे. ‘जकातनाका’मधील ‘जकात’ हा फारसी शब्द आहे. ‘फकत’मधून फक्त तयार झाला.

असे अनेक शब्द आज मराठी भाषेचा अविभाज्य भाग बनले आहेत, पण अशा शब्दांचं मूळ फारसी भाषेत आहे. त्याकाळात सामान्य लोकसुद्धा फारसी भाषा बोलायचे.

इतकंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांनाही फारसी भाषा अवगत होती,” एका मुलाखतीत नसिरुद्दीन यांनी हे विधान केलं होतं. त्यावरून बराच वादंग निर्माण झाला होता.

फिल्मफेअर पुरस्कारांवर काय म्हणाले होते नसिरुद्दीन?

"आता जे काही पुरस्कार मिळाले त्याचा फारसा आनंद नाही. मी आता मला जे फिल्मफेअर अॅवॉर्डस मिळाले आहेत ते माझ्या फार्म हाऊसवर ठेवले आहेत.

त्या फार्म हाऊसच्या बाथरुमच्या दाराचे हँडल त्या पुरस्कारापासून तयार करण्यात आली आहे". असे शाह यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.