Naseeruddin Shah Comment on Rajamouli RRR : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. परखड आणि सडेतोडपणे भूमिका मांडणे यामुळे त्यांना मोठ्या वादाला देखील सामोरं जावं लागलं आहे. आता त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक राजामौली यांच्या आरआऱआऱ आणि अल्लू अर्जूनच्या पुष्पा या चित्रपटाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारे अभिनेते म्हणून शहा यांचे नाव घ्यावे लागेल. केवळ भारतच नाहीतर जगभरातील विविध देशांमध्ये नसिरुद्दीन शहा यांच्या अभिनयाचे चाहते आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांचे मनोरंजन केले आहे. शहा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे सेलिब्रेटी आहेत.
Also Read - नांव Fire - पण पुढचं आयुष्य 'थंडा थंडा, कूल कूल'
काही दिवसांपूर्वी शहा यांनी बॉलीवूडमधील चित्रपट, त्यांचे दिग्दर्शक आणि त्यांच्या कलाकृती याविषयी सडेतोडपणे भाष्य केले होते. त्यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्सविषयी केलेले वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी त्यांना ते चित्रपट पाहून बोलण्याची विनंतीही केली होती.
आता शहा यांनी राजामौली यांच्या आऱआऱआऱ आणि अल्लू अर्जूनच्या पुष्पावर प्रतिक्रिया दिली आहे. मला हे ब्लॉकबस्टर चित्रपट पाहणे खूप अवघड गेले असे त्यांनी म्हटले आहे. वी आर युवा नावाच्या एका युट्युब चॅनेलला त्यांनी मुलाखत दिली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाणही आले आहे. यावेळी त्यांनी शाहिद कपूरच्या कबीर सिंह चित्रपटावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
शहा म्हणाले, सध्या तरुणांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष वेगळ्याच गोष्टींकडे आहे. अमेरिकेमध्ये सुपरहिरो हिट होत असताना आपल्याकडे व्हेन्सडे सारखे चित्रपटही लोकप्रिय होतात ही मोठी गोष्ट आहे. ज्यात अतिरेकीपणा नाही. समाजात जे घडते आहे ते प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न त्यातून करण्यात आला आहे.
मी खरं सांगतो की, आरआरआर आणि पुष्पा सारखे चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला मात्र तो माझ्याकडून पूर्ण झालेला नाही. हे चित्रपट पाहून केवळ रोमांचकारी अनुभव येतो, बाकीच्या सामाजिक, वैयक्तिक मुल्यांचे काय हा प्रश्न हे चित्रपट पाहताना मला येतो. त्यामुळे मला ते पाहता आले नाहीत. अशा शब्दांत शहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.