Naseeruddin Shah: 'पुरुषांपेक्षा महिलाच जास्त काम करतात, पण....' नसिरुद्धीन शहांनी 'मर्द'पणाचं समर्थन करणाऱ्यांवर डागली तोफ!

बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहे जे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यात अभिनेत्री कंगना रनौतचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
Naseeruddin Shah Reaction on Men Dominace Women Work
Naseeruddin Shah Reaction on Men Dominace Women Workesakal
Updated on

Naseeruddin Shah Reaction on Men Dominace Women Work : बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहे जे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यात अभिनेत्री कंगना रनौतचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर प्रख्यात अभिनेते नसिरुद्धीन शहा आणि गीतकार जावेद अख्तर यांचेही नाव घ्यावे लागेल. नसिरुद्धीन शहा हे गेल्या चार दशकांपासून आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय राहिले आहेत. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

आपल्याला जे योग्य वाटते त्यावर आक्रमक आणि तेवढ्याच ठामपणे भूमिका मांडणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये नसिरुद्धीन शहा यांचे नाव येते. त्यांनी यापूर्वी देखील त्यांच्या द ताज नावाच्या मालिकेच्या प्रमोशनच्या वेळी केलेली वक्तव्यं वादाचे कारण ठरली होती. समाजकारण, राजकाऱण आणि कला संस्कृतीवर निर्भिडपणे बोलणारे कलाकार म्हणून नसिरुद्दीन यांना ओळखले जाते. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

नसिरुद्धीन शहा त्या मुलाखतीमध्ये पुरुषांनी दरवेळी आपणच कसे बरोबर आहोत हे सांगताना महिलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करु नये. पुरुष तीन - चार तासांचा प्रवास करुन कामावर जातात, थकून घरी येतात तेव्हा त्यांना असे वाटते की, ते जे म्हणतात त्यानुसार सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. पण घरातील महिला काही रिकाम्या बसलेल्या नसतात. त्याही काम थकून जातात. पुरुषांपेक्षा महिलाच जास्त काम करतात.

Naseeruddin Shah Reaction on Men Dominace Women Work
Nana Patekar : 'आजकालचे अभिनेते हे...' नाना पाटेकर पुन्हा बोलले! जुन्या काळातील दिग्गजांच्या आठवणींना दिला उजाळा

बी अ मॅन नावाच्या शो मध्ये त्यांनी दिलेली ती मुलाखत आता चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. समाजातील पुरुषीपणा, पुरुषी अहंभाव आणि त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम याकडे शहा यांनी लक्ष वेधले आहे. यावेळी शहा यांनी पुरुषी मानसिकतेवर त्यांच्या शैलीत हल्लाबोल केला आहे. आपण आपली विचार करण्याची पद्धत कधी बदलणार आहोत?

Naseeruddin Shah Reaction on Men Dominace Women Work
The Vaccine War : 'नाना तुम्ही व्हॅक्सीन वॉरसाठी किती फी घेतली'? नानांच्या उत्तरातून झालं त्यांच्या मोठेपणाचं दर्शन!

घरकाम करणारी महिला ही अधिक वेगवेगळ्या आव्हांनांना सामोरी जाते. पुरुष एकदा घरातून बाहेर पडला की त्याला वाटते आपल्याकडून होणारे श्रमदान हेच मोठे आहे. त्याच्या तुलनेत बाकी काही नाही. त्याहून एखाद्या गृहिणीला खूपच श्रम करावे लागतात. पण आपण त्याकडे सोयीनं दुर्लक्ष करतो. त्यातही अनेकांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. अशा शब्दांत शहा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.