Kasturi Release Postpone: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी'चं प्रदर्शन लांबणीवर! अडचण काय?

पोसमॉर्टेम करणाऱ्या मुलांच्या संघर्षावरील या चित्रपटाचे नागराज मंजुळे, अनुराग कश्यप सादरकर्ते आहेत.
Kasturi Release Postpone: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी'चं प्रदर्शन लांबणीवर! अडचण काय?
Updated on

मुंबई : 67 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपट हा पुरस्कार पटकावलेला कस्तुरी हा हिंदी चित्रपट येत्या 3 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. निर्मात्या पायल ढोके यांनी ही माहिती दिली. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप हे प्रस्तुत करत आहेत. (National award winner Kasturi movie has been postponed What happened need to know)

Kasturi Release Postpone: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी'चं प्रदर्शन लांबणीवर! अडचण काय?
Sharad Pawar: शरद पवार गटातील 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस; काय आहे प्रकरण जाणून घ्या

प्रदर्शन लांबवणीवर का?

तांत्रिक अडचणी आल्यानं निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पण पुढे तो कधी प्रदर्शित होईल हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. पण लवकरच प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती निर्मात्या पायल ढोके यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

Kasturi Release Postpone: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी'चं प्रदर्शन लांबणीवर! अडचण काय?
Kasturi Marathi Movie : 'पोस्टमार्टेम' करणाऱ्या मुलांच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा 'कस्तुरी' ३ नोव्हेंबर रोजी होणार प्रदर्शित!

नागराज मंजुळे, अनुराग कश्यप करणार सादर

इनसाइट फिल्मची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप हे प्रस्तुत करत आहेत. विनोद कांबळे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

एक उल्लेखनीय बाब अशी की, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, मुख्य कलाकार यांचा हा पहिला चित्रपट असूनही थेट राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत बाजी मारली आहे. तसेच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्येही हा चित्रपट निवडला गेला होता. तिथंही कस्तुरी हा चित्रपट प्रेक्षकांना भावला असून त्याचं खूप कौतुक करण्यात आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Kasturi Release Postpone: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी'चं प्रदर्शन लांबणीवर! अडचण काय?
Khalnayak Reunion: खलनायकचा सिक्वेल येणार? ३० वर्षांनी एकत्र आले कलाकार, हे ठरलं खास कारण

सत्य घटनेवर आधारित सिनेमा

कस्तुरी हा सिनेमा सनी चव्हाण नावाच्या एका पोस्टमार्टम करणाऱ्या मुलाच्या सत्य घटनेवर आधारित असून बार्शी मधील कथा आहे. आपल्या अंगाचा वास येऊ नये म्हणून कस्तुरीच्या अत्तराचा शोध घेणाऱ्या दोन मित्रांची धडपड या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

खरं पाहायला गेलं तर समाजातील एक पारंपारिक काम करणाऱ्या मुलाला पारंपारिक काम करण्यासाठी शिक्षण सोडून द्यावे लागते. कोवळ्या स्वप्नांना नवीन पालवी फुटत असताना ही मुलं आर्थिक व सामाजिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहतात.

Kasturi Release Postpone: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी'चं प्रदर्शन लांबणीवर! अडचण काय?
Koffee With Karan 8: रणवीर - दीपिका - रणबीरला घेऊन करण जोहर १९६० च्या 'या' गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक बनवणार

आठ महिलांची निर्मिती

आपली ओळख आपल्या कामावर ठरत नाही ती आपण काय काम करतो आणि कशाप्रकारे काम करतो यावर ठरते. शिक्षण हे असे माध्यम आहे की ज्यातून माणसात सकारात्मक परिवर्तन घडून येते.

पारंपारिक कामामुळे शिक्षणापासून दूर ढकलले गेलेल्या परंतु शिक्षणाची ओढ असणाऱ्या पोस्टमार्टम करणाऱ्या सत्य घटनेवर आधारित अशा एका मुलाची गोष्ट आहे. एकूण आठ महिलांनी एकत्र येऊन सिनेमाची निर्मिती केली असून चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित होत आहे.

Kasturi Release Postpone: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी'चं प्रदर्शन लांबणीवर! अडचण काय?
Ranveer Deepika Wedding Video: अखेर ५ वर्षांनी रणवीर - दीपिकाच्या लग्नाचा व्हिडीओ समोर, करण जोहर भावुक

प्रमुख भूमिकेत कोण?

या चित्रपटामध्ये समर्थ सोनवणे मुख्य भूमिकेत असून श्रवण उपळकर सह अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. वैशाली केंदळे, सेजल भालके, अनिल कांबळे, विजय शिंदे, मलसिद्ध देशमुख, अजय चव्हाण, कुणाल पवार, साजिद बागवान हे देखील सह कलाकार म्हणून चित्रपटात आहेत.

तर अभय चव्हाण यांनी निर्मिती प्रमुख म्हणून काम पाहिले असून चित्रपटाचे सहलेखन व वेशभूषा शिवाजी करडे यांनी केलं आहे. मनोज काकडे (छायाचित्रण), श्रीकांत चौधरी (संकलन) अतुल लोखंडे (कला दिग्दर्शन), सुरेश कुंभार (रंगभूषा/केशभूषा), विजय शिंदे (पार्श्व संगीत), शोएब मणेरी (साऊंड डिझाईनिंग), महेश क्षीरसागर (निर्मिती सहाय्यक), विजय शिखरे (लाईन प्रोडूसर) पंकज सोनवणे (VFX) यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.