National Cinema Day 2023 : 'फक्त ९९ रुपये द्या अन् थिएटरमध्ये चित्रपट पहा', 'नॅशनल सिनेमा डे' च्या निमित्तानं खास ऑफर

पूर्ण भारतभरामध्ये या तिकिटांची किंमत ९९ रुपये असणार आहे.
National Cinema Day 2023
National Cinema Day 2023esakal
Updated on

National Cinema Day 2023 : राष्ट्रीय सिनेमा डे च्या निमित्तानं एक भन्नाट ऑफर सिनेमाप्रेमींना देण्यात आली आहे. मल्टिप्लेक्स असोशिएषन ऑफ इंडियाच्या वतीनं ही घोषणा करण्यात आली आहे. उद्या (१३ ऑक्टोबर) रोजी हा दिवस सिनेमा डे म्हणून साजरा केला जाणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, असोसिएशनच्यावतीनं देशभरातील ४ हजाराहून अधिक चित्रपटगृहांमध्ये ही ऑफर लागू असणार आहे. पीव्हीआर आय़नॉक्सनं म्हटले आहे की, ही ऑफर काही शहरांमध्ये लागू असेल. येत्या शुक्रवारी सिनेमा प्रेक्षकांना मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा डे च्या निमित्तानं केवळ ९९ रुपयांत चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

Also Read - माणसं मशीन्सशी संवाद करतील आणि ही आश्चर्याची गोष्ट नसेल..

पूर्ण भारतभरामध्ये या तिकिटांची किंमत ९९ रुपये असणार आहे. याविषयीची अधिक माहिती पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस आणि मुव्ही टाईम ने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिली आहे. ही तिकीटं प्रेक्षकांना, बूक माय शो किंवा पेटीएमवरुन बूक करता येणार आहेत. या योजनेमध्ये दक्षिण भारतातील तामिळनाडू, तेलंगाना आणि आंध्रप्रदेश ही राज्यं समाविष्ट नाहीत.

National Cinema Day 2023
Asha Preakh On Kangana : 'तिला फार कळतं का'? ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी टोचले कंगनाचे कान

विविध राज्यांच्या धोरणानुसार त्या ठिकाणी ही ऑफर लागू करण्यात आली आहे. पीव्हीआर आयनॉक्सनं याविषयी सांगितले की, गेल्या वर्षी देखील हा उपक्रम राबवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. यावेळीही प्रेक्षकांकडून त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळेल. अशी अपेक्षा आहे.

National Cinema Day 2023
Ali Fazal : 'कधीही कुणाची हुजरेगिरी केली नाही, हांजी हांजी कशाला करायची'? मिर्झापूरचा 'गुडडू भैय्या' बोलून गेला!

पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, डिलाईट, एमजीएम, बिग सिनेमा, एम्पायर आणि क्रिस्टल या थिएटर्समध्ये ही ऑफर लागू असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.