ब्रह्मास्त्रमुळे वाढली ७५ रुपयांच्या तिकिटाची प्रतीक्षा; हे आहे कारण...

२०२२ हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी चांगले राहिले नाही
National Cinema Day News
National Cinema Day NewsNational Cinema Day News
Updated on

National Cinema Day News आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या यशामुळे १६ सप्टेंबर रोजी साजरा होणारा राष्ट्रीय सिनेमा दिवस (National Cinema Day) २३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात येणार होता. या दिवशी अनेक मल्टिप्लेक्स चेन प्रेक्षकांना ७५ रुपयांचे तिकीट ऑफर करतील असे सांगितले जात होते. परंतु, आता हा दिवस पुढे ढकलत मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने निवेदन जारी केले आहे.

सोशल मीडियावर माहिती देताना लिहिले की, अनेक भागधारकांची विनंती लक्षात घेऊन राष्ट्रीय चित्रपट दिन पुढे ढकलण्यात आला आहे. अधिकाधिक मल्टिप्लेक्स साखळींनी यात सहभागी व्हावे, यासंदर्भातील गोष्टीही ठरल्या आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपटामुळे पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये गर्दी परतली आहे.

National Cinema Day News
प्रकाश झा अभिनेत्यांवर संतापले; म्हणाले, त्यांचा जीव गुटखा विकण्यात अडकलाय

यामुळे चित्रपटगृहांच्या मालकांना कमाई करायची आहे. यामुळे त्यांनी राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day) पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर प्रेक्षक चित्रपटगृहात परतले आहेत. त्यामुळे आता २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे.

२०२२ हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी चांगले राहिले नाही. फक्त गंगूबाई काठियावाडी, द काश्मीर फाईल्स आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैया २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला. मोठ्या अभिनेत्यांचेही चित्रपट चालले नाही.

नुकताच ब्रह्मास्त्र प्रदर्शित झाला आहे. यामुळे चित्रपट मालकांना कमाई करायची आहे. ब्रह्मास्त्र प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने देशांतर्गत बाजारात १४३ कोटींचे कलेक्शन केले आहे. तर परदेशात ६५ कोटींची कमाई केली आहे.

National Cinema Day News
सनी लिओनी झाली गुलाबी; पहा सुंदर फोटोशूट

अनेक चित्रपटगृह राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त ७५ रुपयांची तिकिटे ऑफर करणार आहेत. ‘भारतीय चित्रपट उद्योग तोट्याचा सामना करीत होता. मात्र, ब्रह्मास्त्रने सर्वांसाठी आशा निर्माण केली आहे’ असेही निवेदनात म्हटले आहे.

चित्रपटसृष्टी जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करीत आहे. केजीएफ २ आणि आरआरआरने तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यामध्ये हॉलिवूडमधील काही चित्रपटांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.