Anupam Kher tweet On National Film Awards 2023: गुरुवारी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणुन आलिया भट्ट आणि क्रिती सेनन यांनी पुरस्कार मिळवला तर अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुष्पासाठी अल्लूनं हा पुरस्कार मिळवला. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणुन 'सरदार उधम' तर आर माधवनचा 'रॉकेटरी द नंबी इफेक्ट्स' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
काश्मीर फाइल्सला नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला आहे.
सर्वांनीच त्याचे अभिनंदन केले. 'द काश्मीर फाइल्स'ने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनुपम खेर यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली ज्यात त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त केली.
'द काश्मीर फाइल्स'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अनुपम खेर यांनी द काश्मीर फाइल्सच्या सेटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचबरोबर ट्विटरवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'द काश्मीर फाइल्स'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या चित्रपटाला नॅशनल इंटिग्रेशनवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही तर चित्रपटाचा कार्यकारी निर्माता म्हणूनही मिळालेली ओळख पाहून मी आनंदी आहे.
अनुपम खेर यांनी पुढे लिहिले, "मला माझ्या अभिनयासाठी पुरस्कार मिळाला असता तर मला खूप आनंद झाला असता. पण सर्व इच्छा पूर्ण झाल्या तर पुढे काम करण्याची मजा आणि उत्साह कसा असेल. या, पुढच्या वेळी... प्रत्येक विजेत्याचे अभिनंदन. विजयी व्हा."
तर दुसरीकडे विवेक अग्निहोत्रीही त्याच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त केला. एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी सांगितले की, ते अमेरिकेत आहेत. त्यांना द काश्मीर फाइल्स'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आभार मानले.
द काश्मीर फाईल्सबद्दल बोलायचे तर हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.