RRR Golden Globe : एस एस राजामौली यांच्या आरआरआर वर सध्या जगभरातून कौतूकाचा वर्षाव होतो आहे. या चित्रपटानं गोल्डन ग्लोब जिंकून त्यानं भारतीय चित्रपट विश्वामध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. आता या चित्रपटातील नाटू नाटूचा जगभर गौरव झाला आहे. त्याच्याविषयची मोठी बातमी समोर आली आहे.
नाटू नाटूला गोल्डन ग्लोब मिळाल्यानं चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या गाण्याचे कोरिओग्राफर प्रेम दीक्षित यांनी एका वृत्त वाहिनीशी बातचीत करताना गाण्यासाठी दोन्ही कलाकारांनी किती मेहनत घेतली याविषयी सांगितलं आहे. सोशल मीडियावर नाटू नाटूचं मेकिंग हे चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Also Read -
नाटू नाटू गाण्यामध्ये रामचऱण आणि ज्युनियर एनटीआऱ यांनी ज्या उर्जेनं डान्स केला आहे त्याला तोड नाही. चाहत्यांना तो डान्स कमालीचा आवडला आहे. त्यातील स्टेप्स या सोशल मीडीयावर देखील कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या. याविषयी कोरिओग्राफर दीक्षित म्हणाले की, मला खूप आनंद होतो आहे. नाटू नाटूला गोल्डन ग्लोब मिळणे ही एक मोठी कामगिरी म्हणता येईल.
यासगळ्यात त्या दोन्ही कलाकारांचे कौतूक करावे लागेल. त्या गाण्यासाठी त्यांनी जीव तोडून मेहनत घेतली होती. राजामौली यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी त्यांचे आभार मानावे लागेल. नाटू नाटू हे गाणं युक्रेनमधील राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर शुट झाले होते. त्यासाठी मेोठी तयारी करण्यात आली होती.
लोकप्रिय नाटू नाटू शुट करण्यासाठी दोन महिने लागले होते. आम्ही दोन्ही कलाकारांसाठी ११० मुव्ह्ज तयार करण्यात आले होते. शुट करण्यासाठी वीस दिवस लागले होते. तर ४३ रिटेक्समध्ये हे गाणे आम्ही शुट केले होते. रामचऱण आणि एनटीआर यांची खूप मेहनत होती. त्यांच्याशिवाय या गाण्याला पूर्णत्व नाही. कारण दोन्ही सुपरस्टार जेव्हा एकत्र नाचतात ही मोठी गोष्ट होती.
काही करुन त्या दोन्ही कलाकारांच्या हालचाली सारख्या व्हायला हव्यात हाच आमच्यासाठी मोठा टास्क होता. त्यामुळे खूप संयम ठेवावा लागला, त्यात बऱ्याच चूका होत होत्या. ते दोघेही दररोज तीन तास प्रॅक्टिससाठी येत होते. त्यांच्या एनर्जीचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.