Navardev - Fighter: मुंबईतली लोकं चित्रपट बघायला पुण्यात.. 'फायटर'मुळे 'नवरदेव'ला थिएटर मिळेना?

'फायटर'मुळे 'नवरदेव' या मराठी चित्रपटाला थिएटर कमी मिळत असल्याचा खुलासा झालाय
navardev bsc agri movie less theatre screens due to fighter movie hrithik roshan
navardev bsc agri movie less theatre screens due to fighter movie hrithik roshanSAKAL
Updated on

Navardev Movie - Fighter Movie News: काहीच दिवसांपुर्वी मनोरंजन विश्वात 'नवरदेव: B.sc Agri' आणि 'फायटर' हे दोन सिनेमे रिलीज झाले. 'फायटर' हा हिंदीतला बिग बजेट सिनेमा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'फायटर'ची उत्सुकता शिगेला आहे.

तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आयुष्यावरील संवेदनशील विषयावर आधारित 'नवरदेव: B.sc Agri' सिनेमाचीही खुप चर्चा आहे. इतकंच नव्हे तर थिएटर नसल्याने 'नवरदेव: B.sc Agri' सिनेमा पाहायला मुंबईतील प्रेक्षक पुण्यात येत असल्याची गोष्ट घडलीय. या संदर्भातला व्हिडीओ व्हायरल झालाय.

navardev bsc agri movie less theatre screens due to fighter movie hrithik roshan
Filmfare Awards 2024: "कार्यक्रम गुजरातमध्ये होता म्हणून...", फिल्मफेअरनिमित्त अमृताचं स्वप्न झालं पूर्ण

'नवरदेव: B.sc Agri' बघायला मुंबईची लोकं पुण्यात

'नवरदेव: B.sc Agri' सिनेमाच्या टीमने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत 'नवरदेव: B.sc Agri' सिनेमाची टीम थिएटरमध्ये उपस्थित होती. तेव्हा सिनेमा संपल्यावर एका प्रेक्षकाने 'नवरदेव'चे शो कमी का आहेत? असा प्रश्न विचारला. हा प्रेक्षक मुंबईहून पुण्याला 'नवरदेव: B.sc Agri' सिनेमा पाहायला आलेला.

तेव्हा 'नवरदेव: B.sc Agri' सिनेमाच्या टीमने खुलासा केला की, "फायटर सिनेमा रिलीज झालाय. फार कमी थिएटर आहेत जिथे सिनेमाला स्क्रीन मिळत आहेत. त्यातलं पुण्यातलं सिटीप्राईड आहे. याशिवाय काही ठिकाणी स्क्रीन कमी आहेत. नवरदेव सिनेमा पाहायला लोक पुण्याहून मुंबईला येत आहेत." असा खुलासा झाला.

त्यामुळे हिंदीतल्या बिग बजेट 'फायटर'मुळे 'नवरदेव: B.sc Agri' या मराठी सिनेमाला स्क्रीन कमी मिळत आहेत का? असा सवाल सर्वजण विचारत आहेत.

'नवरदेव: B.sc Agri' सिनेमाविषयी थोडंसं...

'नवरदेव B.sc Agri' सिनेमाचं दिग्दर्शन राम खाटमोडे यांनी केलंय. या सिनेमातील 'लाल चिखल' हे रॅप नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलं!

अभिनेता क्षितीश दाते या सिनेमात तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसेल. त्यासोबतच प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गळगुंडे, विनोद वणवे अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या सिनेमात पाहायला मिळेल. हा सिनेमा २६ जानेवारीला महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.