Amitabh Bachchan: नात नव्या नवेलीनं अमिताभसमोरच छेडला मासिक पाळीचा विषय, म्हणाली,'आता...'

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली भले मनोरंजन सृष्टीपासून अंतर ठेवून असली तरी सोशल मीडियावर तिचं जबरदस्त फॅनफॉलॉइंग आहे.
Navya Nanda Talks about periods in front of Grandfather Amitabh bachchan
Navya Nanda Talks about periods in front of Grandfather Amitabh bachchanGoogle
Updated on

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांची नात भले मनोरंजन सृष्टीपासून अंतर ठेवून असली तरी सोशल मीडियावर तिचं जबरदस्त फॅनफॉलॉइंग आहे. ती नेहमीच खास अंदाजात स्वतःला तिथं प्रेझेंट करते. मग तिचे फोटो असोत,व्हिडीओ असो की नुसतीच एखादी वैचारिक पोस्ट. नव्या नंदा एनजीओ साठी देखील काम करते. नव्या स्वतः एक व्यावसायिका देखील आहे. नव्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात गेली होती,जिथे तिचे आजोबा दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन देखील उपस्थित होते. इथे नव्या नंदानं महिलांच्या आरोग्याविषयी संवाद साधला. तिनं स्त्रियांचं स्वास्थ्य,प्रजनन संस्था ,सेक्स या विषयांवर अतिशय मोकळेपणानं आणि स्पष्टपणे भाष्य करत संवाद साधला. (Navya Nanda Talks about periods in front of Grandfather Amitabh bachchan)

Navya Nanda Talks about periods in front of Grandfather Amitabh bachchan
Big Boss 16: स्पर्धकांचे धाबे दणाणले; आता 'सॉरी' बोलल्यावरही मिळतेय कठोर शिक्षा

नव्या म्हणाली,''देशातील सगळ्याच महिलांना अजूनही आरोग्याविषयीच्या आणि मासिक पाळी संबंधित गरजेच्या वस्तूंचा सहज पुरवठा होण्यास अजून खूप वर्ष जावी लागतील. खूप मोठा प्रवास आपल्याला करायचा आहे. पण आजची स्त्री आपल्या आजोबांसमोर अशा विषयांवर मोकळेपणानं बोलतेय तर हे प्रगतीचं मोठं लक्षण आहे. पहिलं तर आपल्याला एक मोठं पाऊल उचलायचं आहे ते म्हणजे मासिक पाळी आणि मेंटल हेल्थ सारख्या मुद्द्यांना उगाचच कुठल्याही नियमांत बांधून ट्रीट करणं सोडायला हवं. सर्वांनी या विषयावर आपल्या कुटुंबाशी, मित्र-मैत्रिणींसोबत मोकळेपणानं संवाद साधायला हवा''.

Navya Nanda Talks about periods in front of Grandfather Amitabh bachchan
Swara Bhasker: राहुल गांधींसाठी स्वराचं ट्वीट चर्चेत, थेट शायरीतून व्यक्त केल्यात भावना..

''साथीचे रोग आले की त्याला उगाचच मोठं भयानक रुप दिलं जायचं. पण आता त्या दृष्टिकोनात बदल आला आहे. आज मी मंचावर माझ्या आजोबांसोबत बसली आहे आणि त्यांच्यासमोर मी मासिक पाळीविषयी बोलत आहे. आपण गेल्या काही वर्षात जी प्रगती केलीय याचं हे ताजं उदाहरण. नव्याच्या म्हणण्यानुसार महिलांना आणि तरुणांना अशा विषयांवर मोकळेपणानं बोलायला हवं. 'मासिक पाळी एक वरदान आहे,शाप नाही' या विषयावर बोलण्यासाठी आज इथे केवळ महिला नाहीत तर पुरुषांना देखील सामिल केलं आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. आता सुरुवात आपल्या घरातून व्हायला हवी''.

Navya Nanda Talks about periods in front of Grandfather Amitabh bachchan
Big Boss 16: 'हा तर गरिबांचा हृतिक..',गौतमला सुनावताना रॅपरच्या भडकलेल्या चाहत्यांची घसरली जीभ

नव्या आपल्या संवादात पुढे म्हणाली,''समाजात जाऊन बोलण्याआधी स्त्रियांनी सुरुवात आपल्या घरापासून करावी. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की,मी अशा घरात जन्माला आले जिथे आपले विचार मोकळेपणानं मला मांडता येतात''.

नव्याच्या या मनमोकळ्या संवादामुळं तिचं सर्वच स्तरावर कौतूक केलं जात आहे. तिचं हे बिनधास्त राहून आपलं मत मांडणं सगळ्यांनाच आवडलंय. नव्या 'आरा हेल्थ' कंपनीची को-फाऊंडर्स आहे. काही दिवस आधीच नव्यानं आपला पॉडकास्ट शो लॉन्च केला आहे. ज्याचं नाव आहे 'What the Hell Navya'. या शो च्या पहिल्याच भागात नव्यानं श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन सोबत संवाद साधला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.