अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांची मोठी मुलगी श्वेता नंदा हिनं बॉलीवूडमध्ये नाव कमावलं नसलं तरी बॉलीवूडच्या अनेक पार्ट्यांना किंवा फॅशन इंडस्ट्रीतील अनेक कार्यक्रमांना ती आवर्जुन हजर असते. तसं पहायला गेलं तर ती मॉडेलिंग क्षेत्रात आधीपासनं होतीच. त्यात ती उत्तम लिहिते. फॅशन इंडस्ट्रीसंदर्भातही तिनं बरंच लिखाण केलेलं आहे. आई-वडील मोठे स्टार असतानाही तिनं मात्र बॉलीवूडपासनं एका ठराविक अंतरावर राहणंच पसंत केलं. श्वेताला एक मुुलगी अन् एक मुलगा. तिचा मुलगा बॉलीवूडमध्ये लवकरच एन्ट्री करतोय तर दुसरीकडे तिची मुलगी नव्या नवेलीही(Navya Naveli Nanda) अनेक कारणांमुळे चर्चेत आतापर्यंत आली आहे. खूप आधी शाहरुखचा मुलगा आर्यन खान सोबतच्या तिच्या एका फोटोमुळे संपूर्ण बच्चन-नंदा कुटुंबियांना सर्वांनी नावं ठेवली होती. तर काही दिवसांपूर्वी एका बॉलीवूड अभिनेत्याला ती डेटिंग करतेय अशीही चर्चा तिच्याबाबतीत होती. असो,तर अशी ही अमिताभ बच्चन यांची मोठी नात आता मात्र एका चांगल्या कारणामुळे चर्चेत आली आहे. काय आहे कारण?सविस्तर वाचा.
नव्या नवेली नंदानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनं छान तिच्यावर खुलून दिसेल अशा पिच रंगाची साडी नेसली आहे. ज्या साडीच्या किनारावर केलेलं सिल्वर वर्क खूप उठून दिसत आहे. गळ्यात सिम्पल ज्वेलरी घालून मोकळे सोडलेले केस तिला अधिक शोभून दिसत आहेत. या फोटोला जर थोडं निरखून पहाल तर यात तिचे केस थोडे पांढरे झालेले दिसत आहेत. जे तिने कलर न करता तसाच फोटो क्लिक केला आहे. इतकंच नाही तर तिनं या फोटोला कॅप्शन दिलंय की,''माझे पांढरे केस पहा''. आता सेलिब्रिटी घराण्यातली असूनही इतकं बिनधास्तपणे आपल्या लूकची चिंता न करता जे आहे ते तसंच तिनं दाखवून नेटकऱ्यांची मनं मात्र जिंकली आहेत. तिच्या या फोटोवर सगळ्यांनी खूप चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. एकाने तर म्हटलंय,''तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आहे,सांगू का?'' नव्या नवेली नंदाचा हा साडीतला अंदाज मात्र सर्वांना भावलेला दिसून येतोय. आता 'ग्रे हेअर इज इन फॅशन' असं म्हणायला हरकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.