नवाझुद्दिनच्या बंगल्यातील 'बाथरुम' ची का होतेय चर्चा,काय घडलंय ?

काही दिवसांपूर्वीच अभिनेता वर्सोवा येथील त्याच्या नवीन बंगल्यात राहायला आला आहे.
Nawazuddin Siddiqui And his New Home
Nawazuddin Siddiqui And his New HomeGoogle
Updated on

नवाझुद्दिन (Nawazuddin Siddiqui) बॉलीवूड(Bollywood) मधला एक उत्तम नट म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. गेल्या काही दिवसांत त्याच्या सिनेमांसोबतच तो चर्चेत आला ते त्याच्या बायकोसोबतच्या वादांमुळे,नंतर कंगनाशी(Kangana Ranaut) वाढत जाणाऱ्या त्याच्या मैत्रीमुळे आणि नंतर त्यानं मुंबईत बांधलेल्या आलिशान बंगल्यामुळे. काही दिवसांपूर्वीच तो त्या नवीन बंगल्यात रहायला गेला आहे. त्यानं म्हणे स्वतः बंगल्याची डिझाईन नेमकी कशी असावी हे ठरवण्यात पुढाकार घेतला होता . तब्बल तीन वर्ष त्याच्या या नव्या बंगल्याचं काम सुरु होतं.

Nawazuddin Siddiqui outside his new home.
Nawazuddin Siddiqui outside his new home.Google

त्यानं बंगल्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले अनं त्याच्या आलिशान बंगल्याच्या लूकची चर्चा सुरु झाली. पण आता एका वेगळ्याच कारणामुळे त्याचा बंगला चर्चेत आला आहे. नवाझुद्दिन सिद्दिकीने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या बंगल्यातील बाथरुमविषयी ती गोष्ट सांगितली आणि लगेच त्याच्या बंगल्यातलं ते बाथरुम व्हायरल झालं ना राव. म्हणजे चर्चा तर होणारंच ना. त्यानं मुलाखतीत म्हटलं आहे,''मी आता ज्या बंगल्यात राहतो ते बाथरुम माझ्या जुन्या घरापेक्षा मोठं आहे''.

नवाझुद्दिन त्याच्या स्ट्रगलिंग काळाविषयी बोलत होता. त्यानं सांगितलं,''तेव्हा आम्ही एका फ्लॅटमध्ये तीन जणं मिळून रहायचो. म्हणजे भाडं विभागून देणं परवंडायचं. २०१२ मधील 'गॅंग्ज ऑफ वासेपूर' या सिनेमाच्या यशानंतर नवाझुद्दिनचं नशीबच पालटलं. पण तोपर्यंत मात्र तो सिनेइंडस्ट्रीत चाचपडत होता. त्यावेळी त्यानं अनेक घरं बदलली. पण तेव्हा इतर काही यशस्वी अभिनेत्यांना डोळ्यासमोर ठेवत त्यानंही एक दिवस आपला स्वतःचा बंगला मुंबईत असेल असं स्वप्न मनात बाळगलं. जे त्यानं खरं करून दाखवलं.

Nawazuddin Siddiqui And his New Home
'आता तुमचं वय झालं,थकलेले दिसता'; यावर चाहत्याला अमिताभचं चोख उत्तर

त्याच्या मुलाखतीत तो पुढे म्हणाला,''आज माझं स्वतःचं स्वतंत्र इतकं मोठं बाथरुम आहे,त्या आकाराच्या घरात मी आधी रहायचो. ते घर इतकं छोटं असायचं की साधा घराचा दरवाजा उघडला तरी बसलेल्या-झोपलेल्या कोणाच्यातरी पायाला लागलायचा तो. आम्ही तीन-चार जणं एकत्र मिळून रहायचो. २००५ नंतर मी स्वतंत्र घर घेऊन राहू लागलो. नवाझुद्दिनच्या त्या बंगल्याचं नाव त्यानं नवाब असं ठेवलं आहे. ते नाव त्याच्या वडिलांचं आहे. हा बंगला तयार होण्यापूर्वीच त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे या मोठ्या घरात वडिलांना रहायला आणायचं त्याचं स्वप्न अर्धवट राहिल्याचं तो म्हणाला. त्यानं वर्सोवा इथं बांधलेला त्याचा हा बंगला म्हणे त्याच्या गावाकडच्या उत्तरप्रदेशातल्या बुढाना येथील घरासारखा हुबेहूब आहे. त्यानं बंगल्याचा रंग पांढराशुभ्र ठेवल्यानं त्याचं एक वेगळंच आकर्षण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.