'NCB'च्या निशाण्यावर असलेली अनन्या पांडे आहे कोण?

केंद्रीय अंमलीपदार्थविरोधी पथकानं NCB आज अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे इथल्या घरावर छापा टाकला.
'NCB'च्या निशाण्यावर असलेली अनन्या पांडे आहे कोण?
Updated on

मुंबई - केंद्रीय अंमलीपदार्थविरोधी पथकानं NCB आज (गुरुवारी) अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे इथल्या घरावर छापा टाकला. आर्यन खानच्या व्हॉट्स अॅप चॅटमधून एका अभिनेत्रीच नाव समोर आलं होतं. ती अभिनेत्री अनन्याचं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘स्टुडन्ट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनन्या ही चंकी पांडे यांची मुलगी आहे. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. अनन्याचा जन्म १९९८ मध्ये मुंबईत झाला. तिने तिचे शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केलं आहे.

तिने अभिनयाची सुरुवात २०१९ मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इअर २’ मधून केली. त्यानंतर कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरसह 'पती पत्नी और वो' या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती .२०१९ मध्ये चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांनी आयोजित केलेल्या 'न्यूकमर राऊंडटेबल' या कार्यक्रमात अनन्या पांडेने घराणेशाहीवर केलेल्या विधानामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. तिच्या अशाच वादग्रस्त विधानामुळे ती नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते.

अनन्याने सोशल मीडियावरील ट्रोलिंगविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी, नकारात्मकतेला रोखण्यासाठी 'सो पॉझिटिव्ह' (So Positive) या नावाचा उपक्रम सुरू केला होता. तसेच ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. २०२० मध्ये 'खाली पीली' या अॅक्शन चित्रपटात तिने काम केलं होतं, आता ती दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत शकुन बत्रा दिग्दर्शित एका रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'लायगर' या चित्रपटातही झळकणार आहे.

'NCB'च्या निशाण्यावर असलेली अनन्या पांडे आहे कोण?
'हा माझा शेवटचा व्हिडिओ, त्यानंतर मी नसेल', झालंही तसचं...
'NCB'च्या निशाण्यावर असलेली अनन्या पांडे आहे कोण?
रामायणात निषाद राजची भूमिका करणारे अभिनेते कालवश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()