'जेव्हा प्रवाहविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करतो..'; क्रांती रेडकरचं सूचक ट्विट

समीर वानखेडेंवर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर क्रांतीचं ट्विट
Sameer Wankhede Kranti Redkar
Sameer Wankhede Kranti Redkar
Updated on

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरण केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथकाचे NCB विभागीय संचालक समीर वानखेडेंनी Sameer Wankhede केलेल्या कारवाईनंतर अनेकदा त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वानखेडेंवर विविध आरोपही केले जात आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने Kranti Redkar सूचक ट्विट केलं आहे. 'जर का देव तुमच्यासोबत असेल तर या जगातील कोणतीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही,' असं तिने या ट्विटद्वारे म्हटलंय.

क्रांती रेडकरचं ट्विट-

'जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला बुडण्याची भीती वाटू शकते. पण जर का देव तुमच्यासोबत असेल तर या जगातील कोणतीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही. कारण, फक्त त्यालाच सत्य माहित आहे. शुभ सकाळ. सत्यमेव जयते.'

Sameer Wankhede Kranti Redkar
'हे मी सहन करणार नाही'; क्रांती रेडकरने खोटं वृत्त देणाऱ्यांना सुनावलं

समीर वानखेडेंवर लाच मागितल्याचा आरोप

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंचाने समीर वानखेडेंवर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. 'आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते', असा गंभीर आरोप एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. तर वानखेडे यांनी आपल्यावरील आरोपानंतर रविवारी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. 'मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न सुरू असून हे प्रकरण यापूर्वीच पुढील कारवाईसाठी एनसीबीच्या महासंचालकांकडे सोपवण्यात आलं आहे', असं वानखेडे यांनी पत्रात म्हटलं आहे. आपल्याला तुरुंगात टाकण्याची आणि नोकरी घालवण्याची धमकी दिल्याचा उल्लेखही मलिक यांचे नाव न घेतला वानखेडे यांनी या पत्रात केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()