साडेतीन तासांच्या सर्च ऑपरेशननंतर NCB ने शौविक चक्रवर्तीला चौकशीसाठी घेतलं ताब्यात

shauvik chakraborty
shauvik chakraborty
Updated on

मुंबई- सुशांत सिंह राजपूत केसमध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम शुक्रवारी आता रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांंची चौकशी करणार आहेत. आज सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी रिया चक्रवर्तीच्या प्राईम रोज अपार्टमेंट आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी एनसीबीने धाड टाकली. ही धाड ड्रग प्रकरणात शौविक आणि मिरांडा यांचं नाव आल्याने टाकली गेली.  शौविकच्या घरी साडेतीन तास हे सर्च ऑपरेशन सुरु होतं. एनसीबीने त्याला चौकशीसाठी समन्स बजावले त्यावर शौविकने सोबत नेण्याची इच्छा व्यक्त केली. तर दुसरीकडे मिरांडाच्या घरी धाड टाकून त्याला देखील सोबत नेण्यात आलं आहे. 

नारकोटिक्सचे अधिकारी केपीएस मल्होत्रा यांनी सांगितलं की 'शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला समन्स देण्यात आले त्यांनंतर त्यांना चौकशीसाठी नेलं गेलं. मोबाईल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्क देखील सील केले गेले आहेत.' असं म्हटलं जात आहे की शौविकला आरोपी ड्रग पेडलर्स जैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांच्यासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. शौविकने एनसीबीला त्याला त्यांच्यासोबत नेण्याचीच विनंती केली होती. जैद ९ सप्टेंबर पर्यंत एनसीबीच्या रिमांडमध्ये आहे. तर अब्दुल बासित परिहारलाही एनसीबी शुक्रवारी कोर्टात हजर करणार असल्याचं कळतंय.

या संपूर्ण ड्रग प्रकरणात केवळ ड्रग खरेदी करण्याबाबतंच नाही तर ड्रग्स घेणे, ड्रग्स खरेदी करणे आणि ड्रग्स एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेणे असे आरोप शौविक आणि सॅम्युअल मिरांडावर आहेत. या तीनही प्रकरणात काही आढळून आल्यास सरळ अटक करण्याचा कायदा आहे.यामध्ये रिया चक्रवर्तीचं नावही त्या सगळ्या ड्रग चॅट्समध्ये आहे जे शौविक खरेदी करण्याबाबत बोलत होता. त्यामुळे या तिघांचे जबाब खूप महत्वाचे आहेत. 

महत्वाची बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपी ड्रग पेडलर्स जैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहरसोबत शौविक आणि सॅम्युअल यांचत सरळ सरळ कनेक्स असल्याचं उघड झालं आहे. याव्यतिरिक्त ड्रग चॅटमध्ये श्रुती मोदी आणि जया साहा यांची देखील नावं आहेत.   

ncb raids rhea chakraborty and samuel mirandas house sushant case live updates  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.