Sachin Goswami on Maharashtra Politics News: महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झालाय. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. अजित पवारांसोबत इतर आमदारांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी केलेल्या बंडानंतर अजित पवारांचं हे मोठं बंड होतं. आता महाराष्ट्रातील या राजकीय भूकंपावर अजून महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचे लेखक सचिन गोस्वामींनी पोस्ट केली आहे.
(Ncp Ajit Pawar News sachin goswami On Maharashtra Political Situation Sharad Pawar)
सचिन गोस्वामींनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिलंय की.. महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट..भा ज पा,राष्ट्रवादी, शिवसेना आणि भा ज पा तील काँग्रेसी नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार... (मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या आईचा घो....)
अशी पोस्ट सचिन गोस्वामींनी केलीय. हि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालीय. अनेक जण सचिन गोस्वामींनी केलेल्या पोस्टशी सहमती दर्शवली आहे
दरम्यान अजित पवारांनी आपल्या 35 आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं आहे.
या सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव अत्राम, धनजंय मुंडे, आदिती तडकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.