Neha Singh Rathore Angry Comment On BJP Leader : सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असणाऱ्या नेहानं भाजपच्या नेत्यावर केलेली कमेंट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बिहारमधील कैमुर जिल्ह्यातील लोकप्रिय गायिका नेहा सिंग राठोड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)
नेहानं तिच्या गाण्याच्या माध्यमातून नेटकऱ्यांचे मनोरंजन केले आहे. ती त्या राज्यातील एक लोकप्रिय सेलिब्रेटी असल्याचे दिसून आले आहे. नेहा ही तिच्या गाण्यांबरोबरच त्यावर ज्या प्रतिक्रिया येतात त्यांना देणाऱ्या उत्तरावरुन चर्चेचा विषय झाली आहे. आता तर तिनं भाजपच्या नेत्यांना त्यावरुन सणसणीत उत्तर दिले आहे. त्याचे कारण तिचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो.
Also Read - नांव Fire - पण पुढचं आयुष्य 'थंडा थंडा, कूल कूल'
बिहार राज्यातील लोकप्रिय सेलिब्रेटी म्हणून नेहाकडे पाहिले जाते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर तिला मिळणारा फॅन फॉलोईंगही प्रचंड आहे. त्यामुळे नेहाच्या व्हायरल पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये नेहा आणि तिचा पती हे दिसत असून त्यांनी तिच्या कमरेवर हात ठेवल्यानं त्यावरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. त्यावर आता नेहानं ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
बीजेपीच्या एका नेत्यानं नेहाच्या त्या व्हायरल झालेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिली होती. त्यावर नेहानं देखील तिचा आक्रमपणा दाखवून दिला आहे. नेहानं प्रतिक्रिया दिली आहे की, माझे पती मला त्या फोटोमध्ये सांभाळताना दिसत आहे. त्यावरुन नको ते अर्थ काढू नये. आणि जे मला त्यावरुन बोलत आहे त्यांनी मणिपूरमध्ये महिलांसोबत काय झाले हे एकदा पाहावे. बाकी काही बोलण्याची गरज नाही. अशा शब्दांत तिनं आपला राग व्यक्त केला आहे.
बीजेपीनं त्या फोटोवर प्रतिक्रिया दिली होती की, महिलांचा सन्मान करताना कॉग्रेसचे एक नेते...त्यावरुन सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. त्यावरुन नेहानं ट्रोल करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.